तालुक्यातील १२५ जि.प. शिक्षकांच्या बदल्या – ३५ शिक्षक विस्थापित तालुक्यात २५१ शिक्षकांच्या जागा

0
818
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान ) 

गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या हातात अखेर बदलीचे आदेश पडले. तालुक्यातील गटसाधन केंद्र येथे सर्वांना आदेश पाहायला मिळाले. अनेकांना मनासारखे तर काहींना मनाविरुद्ध शाळा भेटल्याने कुठे आनंदी तर कुठे नाराजी दिसून येत होती.

        तालुक्यात एकूण २५१ शिक्षक कार्यरत होते. त्यातील  बदलीप्राप्त एकूण २१४ पैकी १२५ जणांची बदली झाली तर ३४ शिक्षक विस्थापित राहिले. म्हणजेच त्यांच्या जागी दुसरे आले पण त्यांना दुसऱ्या शाळा मिळाल्या नाही. त्यांना पुन्हा ३१ मे पर्यंत अर्ज करायचा असल्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी सांगितले.
चांदूर रेल्वे तालुका हा शिक्षणातील गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात आपली नंबर एकची जागा बनवून होता. तर या बदल्यांमुळे तालुक्यातील अर्धे शिक्षक बदलून जात आहे. पती-पत्नी एकत्र व अन्य कारणांमुळे अनेकांना सोईचे गावे मिळाली असल्याचे समाधान अनेक शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. तर या बदल्यांमुळे मेळघाटातील अनेक शिक्षकांना मेळघाटच्या बाहेर निघता आले.