चार दिवसांसाठी माहेरी आली मात्र पाणी पाहुन दोनच दिवसात परतण्याची इच्छा >< गढुळ पाण्यामुळे संतापलेल्या युवतीची थेट फेसबुकवर पोस्ट

0
874
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
      चार दिवसांसाठी चांदूर रेल्वे शहरात माहेरी आली. परंतु नगर परिषदकडुन गढुळ, चामडोक व दुर्गंधीयुक्त होणारा पाणीपुरवठा पाहुन दोनच दिवसात सासरी परतण्यासाठी इच्छा एका विवाहीत युवतीने बुधवारी सकाळी ११.४७ मिनीटांनी फेसबुकवर प्रकट करून आपला संपात व्यक्त केला.
      सद्या उन्हाळ्याचे दिवस आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनासुध्दा सुट्ट्या लागल्या आहे. त्यामुळे अनेक विवाहीत युवती, महिला या दिवसांत माहेरी येतात. अशातच एक युवती नुकतीच चांदूर रेल्वे शहरात माहेरी आली. परंतु शहरात होत असलेला पाणीपुरवठा पाहुण ती अचंबित झाली. तिने आपला संताप व्यक्त करण्यासाठी थेट सोशल मिडीयाचा आधार घेतला. फेसबुकवर बुधवारी सकाळी पोस्ट केली. यामध्ये फोटो टाकुन त्यावर लिहले की, ‘चांदुरच पाणी बाप रे बाप….. चार दिवस माहेरी आली आणि पाणी पाहून दोन दिवसात परत जावं वाटत आहे.
पाण्याचा वास पण येत आहे आणि त्यात चामडोक पण येत आहे कस प्यायच हे पाणी आणि मुलगी ला तरी कसं पाजाव..’
        ही पोस्ट बुधवारी फेसबुकवर चांगलीच आकर्षित झाली. गेल्या अनेक दिवसांपासुन शहरात दुर्गंधीयुक्त, गढुळ पाणीपुरवठा होत आहे. परंतु याकडे नगर परीषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता चिडलेल्या युवतीने ही बाब फेसबुकच्या माध्यमातुन सर्वांपुढे आणल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का?  व शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होणार का?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.