!! क्रांती सहकारी कारखान्यामार्फत वृक्षलागवड व संवर्धन मोहीम!!

0
902
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव/ हेमंत व्यास :-

क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापु लाड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वृक्षलागवड आणि संवर्धनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.हा उपक्रम आजच्या पर्यावरणाचा विचार करता अतिशय महत्वाचा वाटतो.१९४७ साली देश स्वतंत्र झाला त्यावेली भारताची लोकसंख्या अवघी ३३ कोटी होती आणि जंगलाचे किंवा वनाचे क्षेत्र ३५ टक्के होते त्यामुले पर्यावरणाच संतुलन होत पाऊसमान नियमीत होते.त्यामुले शेतकऱ्याना मिलणाऱ्या शेती उत्पन्नात शेतकरी सुखी होता.आणि आनंदी होता.लोकसंख्या वाढीबरोबर नागरीकरणासाठी,उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी वृक्षतोड वाढली.वृक्षाची जंगले जावुन त्याठीकाणी सिंमेटकॉक्रेटची जंगले तयार झाली.जागेची गरज भागविण्यासाठी जंगले तोडली वृक्ष तोडत असताना वृक्ष लागवड आणि संवर्धनाकडे पाहीजे तेवढे लक्ष दिले नाही ३३कोटी वरून आतापर्यंत १२५ कोटी लोकसंख्या वाढली जंगलाचे क्षेत्र मात्र ३५ टक्क्यावरून १०टक्क्यापर्यंत खाली आले पर्यावरण बिघडले पावसाच्या अनियमीतपणामुले शेती व शेतमालाचे आतोनात नुकसान झाले.

त्यामुळे दुष्काळ आणि तापमान ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली.यावर उपाय म्हणुन मा.पंतप्रधानानी १००कोटी वृक्ष लागवडीची हाक दिली आहे.यामध्ये क्रांतीअग्रणी डॉ जी डी बापु लाड कारखान्यामार्फत मागील वर्षी राबविलेल्या वृक्षलागवड मोहीमेत ७५गावांनी सहभाग घेतला वृक्षलागवडी पुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता संरक्षणासाठी कुंपण आणि संवर्धनासाठी पुढील तीन वर्ष पाणी देण्याची सोय करून झाडे जगविणेही त्यात समाविष्ट केले आहे.अशा पध्दतीने या उपक्रमाच्या माध्यमातुन सत्तर हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचे नियोजन केले होते अशी माहीती क्रांती साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अरूण आण्णा लाड यांनी दिली.पहील्या टप्प्यात ३९,९१४ वृक्ष लागवड पुर्ण झाली असुन सर्व झाडांना कारखान्या मार्फत दर आठवड्याला टँकरने व ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याचे काम सुरू आहे.तसेच महाराष्ट्र शासन,वन विभाग,विविध शैक्षणीक संस्था यांनी लागवड केलेल्या झाडांना कुंपण करून व पाणी देवून संगोपनासाठी ५८६८इतकी झाडे दत्तक घेतली आहेत.चालु सन २०१८ ते २०१९ च्या पावसाली हंगामातही मोहीम पुढे चालु ठेवुन नव्याने७०,०००किंबहुना त्याहीपेक्षा जादा वृक्ष लागवडीचे नियोजन कारखान्या मार्फत केले असल्याचेही कारखान्याचे चेअरमन अरूण आण्णा लाड यांनी सांगीतले.तसेच नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर ५०,०००फलझाडे लागवडीचे उद्दिष्ट आहे.शाश्वत पाण्याची व्यवस्था असणाऱ्या व खड्डे काढुन वृक्षलावण व वृक्ष संगोपन करणाऱ्या कारखान्याच्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राच्या बांधावर लागण करण्यासाठी आंबा,चिक्कु,नारल,चिंचव आवला या फलझाडाची रोपे मोफत देण्यात येणार आहेत.वृक्ष लागवडीसाठी ७०,०००रोपे उपलब्ध केली आहेत.रोपे मर्यादित असल्याने मागणी अर्जा प्रमाणे खड्डे काढुन लागण करणाऱ्या शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध असे पर्यंत देण्यात येतील तरी इच्छुक संस्थानी शेतकऱ्यांनी ७/१२उताऱ्यासह लेखी अर्ज शेतीगट कार्यालयात जमा करून नाव नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.