चांदूर रेल्वे शहरात सलग दोन दिवस पावसाची हजेरी – चांदूरवासीयांना मिळाला काहीसा दिलासा

0
1363
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
     जीवाची काहिली करणाऱ्या कडक उन्हानंतर गुरूवार व शुक्रवारी दोन्ही दिवस सायंकाळी झालेल्या पावसाच्या दमदार शिडकाव्याने चांदूरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला.
     गेल्या अनेक दिवसांपासून तापमानामुळे त्रास सहन करणाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भरदुपारी ४३-४४ अंश सेल्सिअस तापमानानंतर सलग दोन दिवस सायंकाळी चांदूर रेल्वे शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामुळे परिसरात थंडावा पसरला होता.