शेंदुरजनाघाट नगरपरिषद तसेच १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजयुमो तर्फे सत्कार

366
जाहिरात

वरुड :- 

शेंदुरजना घाट नगरपरिषदला स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत संपुर्ण देशातुन द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल भाजयुमो अमरावती तर्फे शेंदुरजना घाट नगरपरिषदचे नगराध्यक्ष श्री. रुपेश मांडवे, मुख्याधिकारी श्री.ओहोड साहेब, उपनगराध्यक्ष श्री.सतिश अकर्ते तसेच सर्व नगर परिषद कर्मचार्यांचा भाजयुमो अमरावती जिल्हाध्यक्ष वेदांतभाऊ शुरपाटणे तसेच जिल्हा सरचिटणीस समीर दादा हावरे, जिल्हा उपाध्यक्ष तुषार पाटील बायस्कार, जिल्हा उपाध्यक्ष रवि राज पुरी, विद्यार्थी आघाडीचे धम्मराज नवले, सोशल मिडीयाचे अनिकेत शेगोकार, धनराज अकर्ते,भाजयुमो वरुड तालुकाध्यक्ष मनोज माहुलकर, प्रविण कुंडलकर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालामधे शेंदुरजना घाट मधुन प्रथम आलेल्या कु.अक्षदा प्र. येवले हीचा पुष्पगुच्छ व पेढा भरवुन सत्कार करण्यात येवुन तिला उज्वल भविष्याकरीता संपुर्ण भाजयुमो जिल्हा तर्फे वेदांतभाऊ शुरपाटणे यांनी व जिल्हा विद्यार्थी आघाडी तर्फे धमराज नवले यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रिकेश राजस, बंडु काळे, कपिल खेरडे, भुषण हिवसे, विजय माहुलकर, मनिष हुरडे, भुषण खोब्रागडे, चंद्रशेखर कुकडे, आदित्य कर्दे,मयुर माहुलकर, देवांग देशमुख आदी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।