शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा तसेच दोन हजार रूपये पेंशन द्या – जनता दल (सेक्युलर) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
766
Google search engine
Google search engine
नाफेडची खरेदी सुध्दा पुर्वरत सुरू करण्याची मागणी 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
 शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे तसेच नविन कर्ज तातडीने द्यावे, ६० वर्षावरील शेतकरी-शेतमजुरांना दरमहा दोन हजार रूपये पेंशन द्यावी तसेच नाफेडने बंद केलेली हरभरा व तुरीची खरेदी पुर्वरत सुरू करून शेतकऱ्यांची रक्कम तत्काळ द्यावी अशी मागणी जनता दल (सेक्युलर) च्या वतीने सोमवारी एसडीओं मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.
शेतकऱ्यांचे चित्र अत्यंत विदारक आहे. शेती हे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एकमात्र साधन आहे. कितीही बिकट परिस्थिती आली तरी शेतकऱ्यांनी कधी शेती सोडली नाही. बहुसंख्य शेतजमीनी कोरडवाहू पीक निसर्गाच्या लहरीवर पावसावर अवलंबून आहे. अनेकवेळा दुबार पेरण्या, अनेक वेळा नापिकी, उत्पादन बेभरवशाचे एवढे सगळे करूनही पीक आले तर बाजारात पुरेसा दाम नाही. तसेच संरक्षण द्यायला सरकार तयार नाही. म्हणून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकारने माफ करावे व शेतकऱ्यांना नवीन कर्ज तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतमालाचे भाव सरकार स्थिर ठेवू शकत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अधिकारी-कर्मचारी, खासदार, आमदार, मंत्री यांना पेन्शन मिळते. परंतु शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे साठ वर्षांवरील शेतकरी – शेतमजुरांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन मिळावी कारण केरळ, गोवा, पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांमध्ये शेतमजुरांना पेन्शन मिळते तर मग महाराष्ट्रात का नाही ? यासाठी जनता दल सेक्युलर सन २०१२ पासून आंदोलन करीत आहे. तसेच नाफेडने शेतकऱ्यांच्या हरभरा व तुरीची खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय झाला आहे. बंद केलेली हरभरा व तुरीची खरेदी नाफेड पूर्ववत सुरू करावी व नाफेडने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे तातडीने द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना पेरणीकरीता व बी-बियाणे खरेदी करिता उपयोगात येईल अशी मागणी जनता दल (सेक्युलर), चांदूर रेल्वेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.
         यावेळी गौरव सव्वालाखे, मेहमुद हुसेन, धर्मराज वरघट, दादाराव डोंगरे, साहेबराव शेळके, संजय डगवार, सुधिर सव्वालाखे, डॉ. उत्तमराव पडोळे, अंबादास हरणे, अवधुत सोनवने, छायाताई झाडे, अॅड. सुनिता भगत, रमेशराव गुल्हाणे, शंकरराव आंबटकर, प्रकाश बन्सोड, अशोक हांडे, प्रमोद बिजवे, अशोक रोडगे, नंदु घोडेस्वार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.