घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा महाविद्यालयाचा निकाल ९४.५८ टक्के – काजल भोले आली प्रथम

0
795

घुईखेड –

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा एच.एस.सी. व्होकेशनल विभागाचा निकाल ९४.५८ टक्के लागला आहे.
व्होकेशनल विभागाच्या ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यापैकी तीन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २० विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. काजल किसनराव भोले ही विद्यार्थीनी शाळेच्या विभागातुन प्रथम आली असुन तिला ७७.२३ गुण प्राप्त झाले. तर प्राजक्ता जितेंद्र तायडे हिने ७६.३० टक्के गुण मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असुन भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.