कॉंग्रेसच्या एमएलसीच्या सभेला होती केवळ राधिका घुईखेडकर यांची उपस्थिती – चांदूर रेल्वे-धामणगाव मतदार संघातील नेत्याच्या आदेशाने उर्वरीत सर्व अनुपस्थित

0
838
Google search engine
Google search engine
चर्चेच्या माध्यमातुन धक्कादायक बाब आली पुढे
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)
      विधान परिषदेच्या निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची प्रचार सभा अमरावतीत झाली होती. या सभेला जिल्हातील विधानसभेचे कॉंग्रेसचे मतदार उपस्थित होते. परंतु यामध्ये चांदूर रेल्वे – धामणगाव विधानसभा मतदार संघातील घुईखेड येथील जिल्हा परिषद सदस्या राधिका घुईखेडकर वगळता इतर कोणतेही मतदार उपस्थित नव्हते. मतदारांना सभेला उपस्थित न राहण्याचे चांदूर रेल्वे-धामणगाव मतदार संघातील एका मुख्य नेत्याकडुन सांगण्यात आले असल्यामुळे ते अनुपस्थित राहल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. त्यामुळे त्या एका नेत्याच्या पक्ष दगाबाजीविरूध्द रोष निर्माण होत आहे.
      अमरावती विधान परिषदेची निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला असुन भाजपाचे प्रविण पोटे यांनी एकतर्फी विजय प्राप्त केला. या निवडणुकीत अख्खी कॉंग्रेस भाजपाला विकल्या गेली असुन आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढी गंभीर परिस्थिती कॉंग्रेसवर ओढविल्या गेली आहे. याला चांदूर रेल्वे, तिवसा व अमरावती येथील प्रत्येकी एक नेता मुख्य जबाबदार असल्याचे समजते. कॉंग्रेसचे उमेदवार अनिल माधोगडीया यांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या तीन दिवसांपुर्वी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अमरावती येथे सभा घेतली होती. यासभेमध्ये माणिकराव ठाकरे यांनी पक्षाविरूध्द दगाबाजी करणाऱ्या विरोधात कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. परंतु पक्षाविरूध्द मतदार दगाबाजी करणार हे सभेच्या दिवशीच समजले होते. कारण चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जि.प. सर्कलच्या सदस्या सौ. राधिका प्रविण घुईखेडकर ह्या वगळता इतर कोणतेही धामणगांव-चांदूर रेल्वे मतदार संघातील कॉंग्रेसचे मतदार उपस्थित नसल्याची माहिती मिळाली आहे. चांदूर रेल्वे-धामणगांव मतदार संघातील एका मुख्य नेत्याच्या बंगल्यावरील आदेशाने कॉंग्रेसचे २८ उमेदवार सभेला गैरहजर राहल्याची चर्चा धडाक्यात सुरू आहे. ही माहिती चर्चेच्या माध्यमातुन का होईना मात्र धक्कादायक बाब पुढे आली आहे. हा आदेश केवळ राधिका घुईखेडकर यांनी झुगारून पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाचा मान ठेवला. मतदारांसोबत खुद्द तो नेता सुध्दा गैरहजर असल्याचे समजते. राधिका घुईखेडकर यांच्यासमवेत त्यांचे पती प्रविण घुईखेडकर उपस्थित होते. प्रविण घुईखेडकर यापुर्वी जि.प. सदस्य पदावर विराजमान होते. सद्या ते चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे. आतापर्यंत त्यांनी पंचायत समिती तसेच घुईखेड ग्रामपंचायतचे सदस्यपदसुध्दा भुषविले. घुईखेड सोसाटीवर त्यांचा सलग २०-२५ वर्षांपासुन कब्जा आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात दांडगा संपर्क असल्यामुळे त्यांच्या पत्नीने सुध्दा एकतर्फी विजय प्राप्त केला होता. ते सुरूवातीपासुनच कॉंग्रेस पक्षासोबत जुडलेले असुन केवळ त्यांच्याच पत्नीने पक्षासोबत दगाबाजी न सभेला उपस्थिती दर्शविली होती. कॉंग्रेस उमेदवाराला मिळालेल्या केवळ १७ मतांमध्ये राधिका घुईखेडकर यांच्या मताचा सुध्दा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु धामणगांव मतदार संघातील व चांदूर रेल्वे शहरातील त्या नेत्याच्या पक्षाविरूध्दच्या दगाबाजी बद्दल कमालीची चर्चा सुरू आहे. माणिकराव ठाकरे यांनी निवडणुकीपुर्वी कारवाईचे स्पष्ट संकेत दिलेले असतांना आता मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पक्षातील वरिष्ठांनी कारवाईची सुरूवात चांदूर रेल्वे शहरातील त्या नेत्यापासुन करावी असे मत अनेक शहरवासीयांनी व्यक्त केले. असे असले तरी राधिका घुईखेडकर यांनी पतीसह त्या दिवशी धामणगांव -चांदूर रेल्वे मतदार संघातुन सभेसाठी लावलेली हजेरी ही कोणत्याही परिस्थितीत पक्षासोबतच राहण्याची दिलेली हमी असल्याचे दिसत आहे.
कॉंग्रेसजवळ आहे अनेक पर्याय
येत्या २०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणुक होणार आहे. एमएलसीच्या निवडणुकीमुळे कॉंग्रेसची प्रतिमा मलिन झाली आहे. अशामुळे यंदा धामणगांव-चांदूर रेल्वे मतदार संघातुन कॉंग्रेस नवीन चेहरा देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. असे झाले तर कॉंग्रेसजवळ अनेक पर्याय उपलब्ध असुन स्थानिक नेत्याची यंदा सुट्टी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
सभेच्या दिवशी घेतली आढावा बैठक 
एमएलसी निवडणुकीच्या कॉंग्रेसच्या सभेच्या दिवशी धामणगांव-चांदूर रेल्वे मतदासंघातील नेत्याकडुन नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केल्याचे समजते. म्हणजेच पक्षाचे वरिष्ठ नेते सभेसाठी अमरावतीत आले असतांना त्यांच्या सभेला दांडी मारून स्वत:च दुसरीकडे आढावा बैठक घेणे कितपत योग्य? असा सवाल निर्माण झाला आहे. पक्षापासुन दुर राहणाऱ्या त्या नेत्याला पक्षानेच कायम दूर करावे असेही अनेकांनी म्हणून दाखविले आहे.