….अखेर त्या तलाठीवर निलंबन ची कार्यवाही,

0
1171
Google search engine
Google search engine

उपविभागीय अधिकारी यांची कार्यवाही तर तहसीलदार यांनी का केली नाही कार्यवाही?

वरिष्ठ कडे या प्रकरणावर दादा मागणार:- नाजीमबेग बशीर बेग तक्रारकर्ते
चांदुर बाजार:-प्रतिनिधी

फ्रेबुवारी 2018 ला झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई मिळणाच्या यादीमधून नाव वगळून आणि त्या यादीमध्ये नाव समविस्त करण्यासाठी तलाठी पी.एन.अली यांनी 10000 रक्कमेची मागणी केली असल्याची तक्रार तसेच नैसर्गिक आपत्ती विषयात अपहार करून वैयक्तिक मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याची तक्रार नाजीम बेग रा.शिरजगाव कसबा यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्या कडे केली होती..

या तक्रारी च्या अनुषंगाने चांदुर बाजार येथील तहसीलदार यांनी चौकशी स्थापन करून सखोल चौकशी केली असता,सत्य परिस्थिती लपून लाभ घेतल्याचे दिसून आले.या मध्ये एकूण 161016 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशी शेवटी दिसून आले.तसेच शिरजगाव कसबा 30000च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तलाठी यांनी मोठ्या प्रमाणावर इ वर्गाच्या जमिनीवर कब्जा करीत असल्याची दिसून आल्याने तलाठी याची आळीपाळीने दुसऱ्या मौजे मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून कार्यरत ठेवण्यात आले होते.त्याच प्रमाणे तहसीलदार यांच्या चौकशी अहवाल मध्ये असे निदर्शनास आले की तलाठी पी.एन.अली यांचे पती हे शासकीय कामात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत होते.आर्थिक अनियमितता या कारणासाठी तहसीलदार यांच्या या अहवाल वरून उप विभागीय अधिकारी अचलपूर यांनी तलाठी याना निलंबीत केले आहे.

तसेच तक्रार कर्ते याचा रुपये 10000 मागणी प्रकारनची चौकशी अजून का बरं करण्यात आली नाही अशी चर्चा दिसून येत आहे.तलाठी यांनी वाचविण्याचा तर प्रयत्न तर करण्यात आला नाही ना?अशी शंका तक्रार कर्ते याना असून नैसर्गिक आपत्ती निधी वाटप मधील गैरव्यवहार कार्यवाही करण्याचे उपविभागीय अधिकारी यांनी चांदुर बाजार तहसीलदार यांना सांगितले आहे.मात्र त्यांनी या आधीच कार्यवाही का केली नाही अशी चर्चा आता रंगात जात आहे

आठ महिन्या अगोदर सुद्धा तलाठी याची तक्रार झाली होती त्या तक्रार वर कोणती कार्यवाही झाले हे अस्पष्ट आहे.त्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे संबंधित तलाठी याच्या वर कोणती कार्यवाही केली हे गुलदस्त्यात असल्याची चर्चा शिरजगाव कसबा येथील शेतकरी यांच्या मध्ये सुरू आहे.

शासनाची प्रतिमा मालिन करण्याचे काम तलाठी यांनी केले आहे.त्यामुळे या प्रकरण मध्ये त्यांचे निलंबन न करता त्याच्या वर फसवणूक करण्याबाबत चा गुन्ह्याची नोंद करण्यात यावी.तशी वेळ आल्यास न्यायालयात सुद्धा जाण्यास तयार आहे.
नाजीम बेग तक्रार कर्ते शिरजगाव कसबा