चांदूर रेल्वेत धुव्वाधार पावसाची हजेरी – गाडगेबाबा मार्केटमध्ये साचले मोठ्या प्रमाणात पाणी >< मोठ्या नुकसानीची शक्यता

0
690
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
      यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र त्यापूर्वीच पाऊस सुरु झाला आहे. मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान धूव्वाधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. शहरात जवळपास ४० मिनीटे हा पाऊस बसरला. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते.
       चांदूर रेल्वे तालुक्यात वादळ-वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस मंगळवारी झाला. शहरात दुपारी तुफान पाऊस झाला. शहरातील गाडगेबाबा मार्केटमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासुन शहरात तुरळक पाऊस सूरू होता. परंतु मंगळवारी पहिल्यांदाच एवढ्या मोठा प्रमाणात पाऊस आला. यामध्ये तालुक्यात मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक घरांवरील छप्परे उडाली असुन मोठी झाडे सुध्दा पडली आहे. रात्रीसुध्दा तालुक्यात ढगाळ वातावरण असुन पाऊस येण्याची शक्यता होती.