*राममंदिराचे निर्माण न केल्यास भाजपचा त्याग करीन ! – आमदार टी. राजासिंह, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम युवा सेना, तेलगंण*

0
592
Google search engine
Google search engine

*सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा समारोपीय दिवस*

*रामनाथी (गोवा)* – आज भारत देश सुरक्षित नाही. केरळमध्ये उघडउघड हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होत आहेत. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी राममंदिर निर्माण करणे, गोहत्या बंदी, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, समान नागरी कायदा आदी आश्‍वासने दिली होती; पण प्रत्यक्षात याविषयी काही होतांना दिसत नाही. आज हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या पक्षाच्या नेत्यांची विचारसरणी ही हिंदुत्वाची नसून पक्षाच्या विचारसरणीप्रमाणे असते. आजचे हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे पक्ष सत्तेचे भुकेले आहेत. भाजपने स्वतःच्या धोरणामध्ये सुधारणा करून राममंदिर निर्माणाचे कार्य करावे अन्यथा मी भाजपचा त्याग करीन. जो पक्ष हिंदुहिताचा विचार करेल, अशांनाच जनतेने पुढील निवडणुकीत निवडून द्यायला हवे आणि हिंदुविरोधकांना बहिष्कृत करायला हवे, असे प्रतिपादन तेलंगण येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजासिंह यांनी सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मध्ये केले.
या वेळी व्यासपिठावर उत्तरप्रदेश येथील भक्ती आंदोलन मंचचे प्रांतीय संस्कृती प्रमुख महामंडलेश्‍वर श्री गोस्वामी राजेश्‍वरानंद महाराजजी, पंचकुला (हरियाणा) येथील राष्ट्रीय इतिहास अनुसंधान आणि तुलनात्मक अध्ययन केंद्राचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आदी उपस्थित होते.