*वीरशैव लिंगायतांना सनातन धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र सहन करणार नाही ! – डॉ. विजय जंगम, राष्ट्रीय प्रवक्ता, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, मुंबई*

0
1106
Google search engine
Google search engine

सध्या हिंदु धर्माला तोडण्याचे षड्यंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असून त्यासाठी देशातील अनेक संघटनांना विदेशातून निधी पुरवला जात आहे. वीरशैव लिंगायत हा वेगळा धर्म नसून तो सनातन हिंदु धर्माचेच अविभाज्य अंग आहे. वीरशैव लिंगायत समाजाला हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे. कर्नाटकमधील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंबन करत मते मिळवण्यासाठी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता दिली. असे असले तरी आम्ही लिंगायत समाजाला वेगळे करण्याचे षड्यंत्र सहन करणार नाही. त्याला तीव्र विरोध करू. वीरशैव लिंगायत हे हिंदु होते, आहेत आणि यापुढेही रहाणारच ! लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. भाजपने वर्ष 2019 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात विकासाऐवजी ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचे वचन’ द्यावे.