सरकारी कामकाजात ढवळाढवळ, ६ महिने सक्त मजूरीची शिक्षा – चांदूर रेल्वे येथील दिवानी न्यायालयाचा निर्णय

0
747
Google search engine
Google search engine

मांडवा ग्रा.पं. ची घटना.

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

             चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा ग्राम पंचायत मध्ये ११ जानेवारी २०१४ रोजी सरकारी कामात अडथळा निर्माण व माहितीच्या आधारे माहिती मागण्याच्या वादावादीतुन ग्राम पंचायत सचिव अहिरवार यांच्या सोबत झालेल्या बाचाबाचीमुळे परिपूर्ण श्रीराम इंगोले रा. मांडवा यांच्या विरोधात चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. सचिवांच्या तक्रारी वरून इंगोले यांच्यावर कलम ३४१, ३५३, ३३२, ५०४ भा.द.वि गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा तपास अधिकारी पो.कॉ. सहदेव राठोड होते. सदर प्रकरण सन २०१४ पासून न्याय प्रविष्ट असल्यामुळे बुधवार ६ जुन रोजी चांदूर रेल्वे येथिल प्रथम न्यायदंडाधिकारी एस.सी.खैरनार यांनी निर्णय दिला. यामध्ये परिपुर्ण इंगोले यांची कलम ३४१, ३३२, ५०४ मध्ये निदोर्ष मुक्तता केली. तर कलम ३५३ मध्ये ६ महिने सक्त मजूरीची शिक्षा व १००० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास १५  दिवस अधिक कोठडी सुनावणी करण्यात आली. या प्रकरणात कोर्ट पैरवी ना.पो.काॅ. सुरेन्द वाकोडे यांनी तर सरकारी वकील ए.डब्लु.जुनघरे, आरोपीचे वकील पी.एम.कुलकर्णी यांनी काम पाहीले.