शहरातील ३५ हँडपंप नगर परीषदेेने केले दुरूस्त – नगराध्यक्ष व न.प. प्रशासनाची तत्परता

0
710
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      चांदूर रेल्वे शहरातील हँडपंप अनेक दिवसांपासुन नादुरूस्त होते. यामुळे स्थानिक नगर परीषद प्रशासन व नगराध्यक्ष शिट्टू उर्फ निलेश सुर्यवंशी यांनी तत्परता दाखवित शहरातील ३५ हँडपंपची दुरूस्ती करण्यात आली आहे.
       चांदूर रेल्वे शहराला मालखेड तलावावरून पाणीपुरवठा होतो. परंतु यंदा तलावाची पातळी खाली गेल्यामुळे शहरात काही प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती. परंतु या परिस्थितीत शहरवासीयांना हँडपंपचा आधार व्हावा म्हणुन नगर परीषदतर्फे उन्हाळ्यात जवळपास ३५ हँडपंपची दुरूस्ती करण्यात आली आहे. या हँडपंप दुरूस्तीमुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सद्या मान्सुनपुर्व पाऊस आला असला तरी पुढच्या आठवड्यात पाऊस हुलकावनी देणार असुन तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे पुन्हा पावसाची कमतरता भासणार असली तरी हँडपंप दुरूस्तीमुळे अनेक भागांत पाणी मिळणार आहे.
दोन टँकरने सुध्दा पाणीपुरवठा
शहरात पाण्याची कमतरता भासत असतांना न. प. सत्ताधारी व प्रशासनाने विलंब न करता नाविण्यपुर्ण योजनेतुन एक नवीन टँकर विकत घेतला. त्यानंतर नवीन व एक जुना अशा दोन टँकरने शहरातील विविध भागांत अजुनही पाणीपुरवठा सुरू असुन नगर परीषद शहरवासीयांच्या सेवेत तत्पर असल्याचे दिसत आहे.