प्रथमेश आणि हर्षल यांचे एसएससी मध्ये सुयश

0
846
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार:-
नुकताच एसएससी चा निकाल लागला असून यामध्ये देऊरवादा येथील चि.प्रथमेश विश्वनाथराव दाभाडे याने एसएससी परीक्षेत 93 टक्के गुण प्राप्त केले आहे.तो शिरजगाव कसबा येथील बालमुकुंद राठी विद्यालय,मधील विध्यार्थी होता.तर त्याच्या या यशाने अनेकांना आनंद झाला आहे.तो देऊरवादा या गावचा रहिवाशी आहे.

तसेच काजळी येथे राहणार हर्षल राजू निचत याने सुद्धा एसएससी च्या निकालामध्ये 92%गुण प्राप्त केले आहे.तर त्याला गणित या विषयांमध्ये 99 मार्क्स आहे. त्याने भविष्यात इंजिनिअरिंग करणार असल्याचे सांगितले आहे.