काजळी येथील पुरातन मंदिर अस्तित्व धोक्यात

0
759
Google search engine
Google search engine

सार्वजनिक बांधकाम यांच्या चुकीच्या बांधकाम मुळे मंदिरात, जाणार रस्ता बंद, बांधकाम विभाग चा मनमानी पणा

चांदुर बाजार:-

विदर्भातील छोटी काशी म्हणून प्रसिध्द असलेले देऊरवादा या गावातील आणि पूर्णा नदीच्या काठावर वसलेले पुरातन काळातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.पूर्णा नदीवर नव्याचे नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.मात्र कोणालाही विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी त्या पुलाचे बांधकाम हे मर्जी प्रमाणे केले असल्याची तक्रार काजळी येथील नागरिक आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धार करते रमेशराव रंगराव देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कडे केली आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर याला पुरातन काळापासून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. या ठिकाणी कात्यानी व्रत ,साडे अकरा जागृत जोतिर्लीग,सिद्धेश्वर चे मंदिर या ठिकाणी आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम यांच्या चुकीच्या धोरणामुळे या मंदिरात जाणार रस्ता बंद झाला आहे.आवश्यक नसलेल्या ठिकाणी नदीचे पात्र वळविण्यात आले आहे.त्यामुळे रस्ता आता बंद झाला आहे.मंदिरात जाण्यासाठी आता दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने अनेक याना मंदिरात न जाता बाहेरच दर्शन घ्यावे लागत आहे.

अधिक महिन्यात आणि एकादशी ला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.मात्र आता रस्ता नसल्याने भाविकांना मंदिरात न जाता परतावे लागतील असे चित्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मनमानी पणा मुळे दिसून येते आहे. पावसाळ्यात लवकरात लवकर रस्ता ची वाट करून देण्याची मागणी काजळी देऊरवादा येथील नागरिक कडून होत आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबत योग्य भूमिका कधी घेणार हे कोडेच आहे.
*बॉक्स*
नदीचे पात्र मोठे आणि अधिक खोल सार्वजनिक बांधकाम यांच्या धोरणामुळे झालं आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास यांची जबाबदारी कोण घेणार हे असून न समजणारे आहे.