आज घुईखेड ते पंढरपुर पायदळ दिंडीचे प्रस्थान – संत बेंडोजी बाबा पालखीची १२९ वर्षांची परंपरा >< आज घुईखेडमध्ये भव्य-दिव्य सोहळा

0
777
Google search engine
Google search engine

२७ जुलै ला पंढरपुरला पोहोचणार

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान)

पंढरीसी जा रे आल्याने संसारा। दिनाचा सोयरा पांडूरंग। 
माजि जिवची आवडी। पंढरपुरा नेईन गुडी।। 
नाम घेता वाट चाले। यज्ञ पाऊला पाऊली।।

          आषाढी वारी ही एक मोठी दिंडी आहे. आषाढी पौर्णिमा पायदळ दिंडीचे आयोजन तालुक्यातील घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा संस्थानतर्फे दरवर्षी करण्यात येते. यावर्षीसुध्दा घुईखेड ते पंढरपुर पायदळ दिंडीचेचे प्रस्थान आज (ता. ११) होणार असुन श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा घुईखेडमध्ये संपन्न होणार आहे.
घुईखेड ते पंढरपुर या ४७ दिवसाच्या पायी दिंडीचा सोहळा विविध कार्यक्रमांनी आज घुईखेडमध्ये पार पडणार आहे. यानंतर भाविक घुईखेड येथुन प्रस्थानापासून ते पंढरीपर्यंत चालत सतत  माउलीचे नाव घेत भजन, कीर्तन करत दिंडीत सामील होणार आहे. ही दिंडीचे आज घुईखेडमधून प्रस्थान होऊन २३ जुन रोजी पैठण येथे पोहोचणार आहे. त्यांनतर २४ जुन पैठणवरून निघून ५ जुलैला आळंदीला पोहोचणार आहे व ६ जुलैला आळंदीवरून २६ जुलैला पंढरपुरला पोहोचणार आहे. या दरम्यान अनेक गावांत थांबण्याची, नाश्ता, चहा व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २७ जुलैला विनेकरांचे पंढरपुर काल्यानंतर पुन्हा परतीकडे दिंडीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर, बाळासाहेब देशमुख यांनी दिली.

श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील श्री. ज्ञानेश्वर माऊली रथामागील एकुन २१ मानाच्या दिंड्यापैकी मानाची दिंडी म्हणुन श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान, घुईखेडच्या दिंडीचा १७ वा क्रमांक आहे. व या रथामागे विदर्भ प्रांतातुन जाणारी घुईखेड येथील एकमेव दिंडी आहे. श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान हे १३३७ चे असुन सदर वास्तु ही अतिशय प्राचीन असल्याचा इतिहास दर्शवितो. या पायी दिंडी सोहळ्याची वारकरी संप्रदायाची परंपरा ही एकुन १२९  वर्षापासुन चालत आलेली आहे. तसेच २१ व्या शतकामध्येही पायी दिंडी सोहळ्याची प्रथा आजही अविरतपणे यशस्वीपणे पार पडत आहे. ४७ दिवशीय पायदळ दिंडीमध्ये ज्या भाविक भक्तांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आज सकाळपर्यंत संस्थानमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिंडीमधील सहभागी भक्तांचा खर्च संस्थानतर्फे करण्यात येणार आहे.