सुभेदार मेजर सुनिल डोबाळे यांना मातृशोक

0
626
Google search engine
Google search engine

आकोट – (प्रतीनिधी)

आकोट तालुक्याचे भुमीपुञ पुणे येथे लष्करी सेवेत असणारे सुभेदार मेजर सुनिल डोबाळे यांच्या आई सुमिञाबाई डोबाळे यांचे दि.११जुन रोजी संध्या.5 वा.दरम्यान निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 90 वर्ष वय होते.त्यांच्या पश्चात पाच मुले व दोन मुली असुन अंतीम याञा उद्या दि.१२जुन रोजी स. १० वा.ताजणापुर येथे असणार आहे.

सुभेदार मेजर सुनिल डोबाळे हे पुणे येथे लष्करी सेवेत असुन त्यांचा मिञ परीवार हा सर्व भारतभर असुन लष्करासाठी त्यांनी अनेक ठीकाणी कर्तव्य बजावले आहे.भुमी फाउंडेशन विदर्भचे ते मार्गदर्षक आधारस्तंभ आहेत.त्यांनी मातृभुमीच्या सेवेत असतांनाही मातृसेवेत ही कुठले ही अंतर ठेवले नाही.आईची आठवडाभर आधी झालेली भेट ही त्यांच्यासाठी आईची शेवटची भेट ठरली.आज माझ्या मातृसेवेत विराम आला माञ मातृभुमीच्या सेवेत मी जीवंत असे पर्यंत कुठलाही खंड पडु देणार नसल्याची भावना त्यांनी विदर्भ24न्युज प्रतीनीधी संतोष विणके यांच्याशी जड अंतराने फोनवर बोलतांना सांगीतले