संपूर्ण विधान न ऐकवता जाणीवपूर्वक हवा तो भाग एकवणाऱ्यांचा विरोधात प्रसंगी आम्हीही न्यायालयात जाऊ ! – नितीन चौगुले, कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

0
738

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केलेल्या मार्गदर्शनातील जाणीवपूर्वक अर्धवट भाग दाखवून, ऐकवून प्रसिद्धीमाध्यमे पू. गुरुजींची अपकीर्ती करत आहेत. अखंड देशभक्ती असलेला समाज उत्पन्न करणार्‍या एका ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाविषयी असे करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. जर प्रसिद्धीमाध्यमे कोणतेही भान न ठेवता हवा तेवढाच भाग दाखवून खोटे आरोप करत असतील, तर प्रसंगी आम्हीही न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी दिली आहे.