7 गौवंश यांची जीवित सुटका

0
796
Google search engine
Google search engine

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी कत्तली करता जाणारे 7 गौवंश

रेडवा येथील चौकीवर वर नाकेबंदी लावली असता मंगळवार मध्यरात्री 12.30 ची कार्यवाही

चांदुर बाजार :-

चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस चौकी रेडवा येथे मंगळवारी मध्य रात्री लावलेल्या नाकाबंदी दरम्यान मध्य प्रदेश मधून महाराष्ट्र कडे गाडी क्रमांक MH 14 CP 8545 येत होती.चौकीवरील पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली असता.त्या मध्ये गौवंश असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन ठाणेदार सचिन तायवाडे याना याची माहिती दिली माहिती मिळताच ठाणेदार यांनी घटना स्थळ गाठले आणि घाटलाडकी येथील नागरिकांच्या मदतीने एकूण 7 जनावराची जिवंत सुटका करण्यात आली आणि त्यानं महर्षि गौरक्षण संस्था चांदुर बाजार कडे पाठविण्यात आले.या मध्ये पोलिसानी आरोपी 1) संजय चिंधाजी उपासे वय 26 वर्ष 2) भोजराज शिवचरण साहू वय 25 वर्ष रा आमला ता मुलताई जी बैतूल याना ताब्यात घेऊन त्यांच्या वर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.तसेच त्यांच्या कडून 1,14,000 रु चा माल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई थानेदार सचिन तायवाड़े यांचे मार्गदर्शनात पोलीस कॉस्टबल काले, पोलीस कॉस्टबल पाल, नरेंद्र काले, पोलीस कॉस्टबल काकड़े यांनी केली.आरोपी याना आज न्यायालयात हजर करण्यात आले.असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

*बॉक्स मध्ये *
एकीकडे महाराष्ट्र पोलीस धकड कार्यवाही करीत आहे तर मध्यप्रदेश मधून जनावरं वाहतूक ही जोरात होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आता या सर्वाला आळा घालण्यासाठी शासन स्तरीय प्रयत्न केले गेले पाहिजे अशी मागणी जनते कडून जोर धरत आहे.