सिनेमा चौकातील वरली मटक्यावर पोलीसांची धाड दोन आरोपींना अटक – एसडीपीओ पालवे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शेळकेंची कारवाई

0
754
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    शहरातील सिनेमा चौकातील वरली मटक्यावर गुरूवारी सायंकाळी ४ वाजता उपविभागीय अधिकारी पालवे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शेळके यांनी धाड टाकून दोन आरोपींना अटक केली आहे.
     स्थानिक सिनेमा चौकात वरली मटका सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी पालवे, ठाणेदार शेळके यांनी सिनेमा चौकात धाड टाकून मोबाईल, वरलीच्या चिठ्ठ्या, कॅट (पत्ते), घटनास्थळावरून नगदी २९०० रूपये असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात आरोपी भूषण उर्फ बाब्या कमलनयन गणेडीवाल (३०) व प्रदिप पुंडलीकराव नाईक (३०) दोघांना अटक केली आहे. यानंतर पोलीसांनी आरोपी भूषण गणेडीवाल याच्या घराची झाडाघडती घेतली असता आरोपीच्या घरूण एकूण १ लाख ५७ हजार ५१० रूपये रोख जप्त केली. परंतु ही रक्कम भावाच्या मोबाईल दुकानाची असल्याचे आरोपीने सांगितले. मात्र जप्त केलेली रक्कम कोर्टात पाठविणार असून आरोपीला या रक्कमेबाबत कोर्टात सबळ पुरावे सादर करावे लागणार असल्याचे ठाणेदार शेळके यांनी सांगितले. अटक दोन्ही आरोपी विरूध्द मुंबई जुगार कायदा १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाईत एसडीपीओ पालवे, ठाणेदार शेळके, पाठक, हवालदार चव्हाण, कॉ. सचिन भाकरे, म.कॉ.आरती यांचा समावेश होता.