आयपीएस समीर शेख यांची जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही

0
1803
Google search engine
Google search engine

अवैध जनावर प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती मधील संचालक,सचिव आणि अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये हजरी

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही.हरभरा मोजणी बंद,बाजार समितीचे चे संचालक आमदार बच्चू कडू यांच्या कडे धाव

आयपीएस समीर शेख यांनी चौकशी सुरू तर आरोपी हे मध्यवर्ती कारागृह रवानगी,जमानत पत्र दाखल करून आरोपीची होणार सुटका

चांदुर बाजार:-

स्थनिक चांदुर बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दिनांक 10 जून सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान रविवार ला चांदुर बाजार येथील ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी समीर शेख यांनी धडक कार्यवाही करून 6 आरोपी याना अटक करून 22 गौवंश यांची सुटका केली.या प्रकरणी तपास वेगाने सुरू असून आज दिनांक 13 जून ला कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सचिव,संचालक, याचा चौकशी करीत पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले होते. या प्रकरणात आरोपी याची संख्या वाढणार असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केल्याने आणि वेगाने तपास यंत्रणा सुरू असल्याने लवकरच प्रकरण निकाली निघणार असल्याचे दिसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशन मध्ये चौकशी करीत आल्याने हरभरा नोंदणी चा बुधवार हा शेवटचा दिवस असूनही मोजणी बंद होती.या प्रकरणात 3 दिवसाची पोलीस कोठडी असणारे सहा आरोपी याना बुधवारी न्यालायत हजर केले असता.पोलिसांची चौकशी पूर्ण झाली नसून सर्वच आरोपी यांची पोलीस कोठडी ची मागणी आयपीएस समीर शेख यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ती नाकरली.तसेच जमनात घेताना सालनशी प्रति आरोपी 2,00,000 पर्यत जमा करण्याचे आदेश मिळाले आहे.तसेच काल ती न दिल्याने त्या सहाही आरोपी याना मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली. तर पकडलेला 22 गौवंश मध्ये 1 गौवंश यांचा मुतृ झाला आहे.त्यामुळे प्रकरण आणखीच गंभीर वळण घेतले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मधून जनावर यांच्या खरेदी आणि अवैध वाहतुक बाबत आज दिनांक 13 जून ला आयपीएस समीर शेख यांनी बाजार समिती संचालक याना तसेच बाजार समिती मधील स्थायी आणि अस्थयी स्वरूपात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांची चौकशी लावली होती.तब्बल 5 तासापर्यत ही चौकशी बंद दरवाज्या आत मध्ये सुरू होती.या चौकशी मध्ये पोलिसांना महत्त्वाचे दस्तऐवज सापडले आहे.त्यामुळे बाजार समिती मधील संचालक यांच्या वर सुद्धा या चौकशी ची टांगती तलवार होतीच दिनांक 14 जून ला इतर संचालक यांची चौकशी करण्यात आली होती.

कृषी उपत्न बाजार समिती मधील काही संचालक यांनी आमदार बच्चू कडू यांच्या सोबत सार्वजनिक विश्राम गृह अमरावती येथे दिनांक 13 जून बुधवार लाभेट घेण्यात आली. त्यांच्या या भेटीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले तापले असून चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे ती भेट कशासाठी होती ते अजून स्पस्ट झाले नाही.

तसेच फरार तीन आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मधील 3 टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण ची टीम रवानगी झाली असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.लवकरच फरार आरोपी यांचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मध्य प्रदेश मधून चोरट्या मार्गानी होणारी अवैध जनावर वाहतूक बंद झाल्याने बाजार समिती चा आधार घेऊन जनवरची अवैध वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे.तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात समीर शेख आयपीएस यांच्या कार्यवाही मुळे जोरदार चर्चा सुरू आहे.