अकोट शहर पोलिसातर्फे रूट मार्च

0
1122
Google search engine
Google search engine

आकोटः ( प्रतीनिधी)

अकोट शहरात गेल्या महिनाभर मुस्लिम बांधव रोजे ठेवून पवित्र रमजान महिना साजरा करीत आहेत. येणाऱ्या रमजान ईद निमित्य कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून अकोट शहर पोलिसातर्फे रूट मार्च चे आज दि. १४ जुनला आयोजन करण्यात आले

होते, सदर रूट मार्च मध्ये पोलिस स्टेशन अकोट शहर, अकोट ग्रामीण व आर सि पी पथकाचे जवान सहभागी झाले होते,रुट मार्च दरम्यान ध्वनिक्षेपक वर अकोट शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात येत होते. तसेच अकोट शहर पोलिस आपल्या सरक्षणास सदैव तयार असल्याचे सांगितल्या जात होते, सदर रूट मार्च मध्ये अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके, ग्रामीण चे पोलिस निरीक्षक मिलिंद बहाकर, साहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर, फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई, शरद माळी, शिंदे, व 65 कर्मचारी हजर होते