*आमदार श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील आपतग्रस्तांकडे भेटी – आर्थिक मदत करून सहकार्य*

0
790
Google search engine
Google search engine

सावली :-

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा उपगटनेते विधिमंडळ मान. श्री विजयभाऊ वडेट्टीवार हे अडचणीत असणाऱ्या कुटुंबांना नेहमी मदत करीत असतात. दिनांक 14 जून 2018 ला सावली तालुक्यातील गावात जाऊन आजारी असलेल्या, घरचे प्रमुख मृत पावलेल्या घरातील कुटुंबाची भेट घेत आर्थिक मदत करून त्यांना सहकार्य केले.

सावली येथील नंदाबाई देविदास रायपुरे यांना कॅन्सर झाल्याने त्यांची भेट घेत उपचारासाठी 5000 रुपयाची आर्थिक मदत केली

सावली येथील सुखदेव निकोडे या तरुणाचे निधन झाल्याने लहान लहान मुलांची जबाबदारी विधवा महिलेवर आल्याने त्यांचे सांत्वन करीत 5000 रुपयाची आर्थिक मदत केली.

पारडी येथील बापूजी नरुले याचा अपघातात मृत्यू झालेला होता त्यांचे घरी भेट देत 5000 रुपयाची आर्थिक मदत केली.

पारडी येथील अंगणवाडी सेविका गेडेकर यांचे ह्रदयविकाराने निधन झाले होते त्यांचे घरी भेट दिली
खेडी येथील प्रणित तुळशीराम मोहूर्ले याचा हाताला दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्याची पाळी आल्याने पुढील उपचाराकरिता 5000 रुपयाची मदत केली. खेडी येथील रवींद्र कोसरे याचा अपघातात मृत्यू झालेला होता त्यांचे कुटुंबास भेट देत 5000 रुपयाची मदत दिली.

सोबत तालुका अध्यक्ष यशवन्तजी बोरकुटे, नगराध्यक्ष विलासजी यासलवार, माजी सभापती राकेशजी गड्डमवार, पंचायत समिती गटनेते विजय कोरेवार, उपाध्यक्ष भोगेश्वरजी मोहूर्ले, बांधकाम सभापती छत्रपती गेडाम, नगरसेवक संदीप पुण्यपवार, स्वप्नील संतोषवार, संकेत बल्लमवार, अनिल म्याडावार, अतुल येलेंट्टीवार उपस्थित होते