गौरी लंकेश, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी हत्या प्रकरणात सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचा थेट संबंध नाही ! – एस्आयटी

0
725

 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या नावाने थयथयाट करणार्‍या पुरोगाम्यांना चपराक !

 

बेंगळूरू – कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे नाव घेण्यात येत होते; परंतु कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (‘एस्आयटी’ने) केलेल्या तपासातून हिंदु  जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे, अशी माहिती ‘एस्आयटी’च्या अधिकार्‍याने दिल्याचे वृत्त ‘दैनिक लोकसत्ता’ने दिले आहे.