अकोट शहर पोलिसांच्या तत्परतेने हरवलेली लाडली दोन तासातच आईच्या कुशीत

0
787
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-

हरविलेल्या अल्पवयीन मुलीला 2 तासातच आई वडिलांच्या कडे पोहचवुन देत आकोट शहर पोलीसांनी माणुसकीचा ओलावा जपत आपले कर्तव्य पार पाडले.विशेष म्हणजे विविध सामाजीक उपक्रमांसह ,खंबीर सोशल पोलिसिंग राबवणारे ठाणेदार गजानन शेळके व त्यांचा संपुर्ण स्टाफने दाखवलेल्या या संवेदनशीलतेच्या परीचयाने सामान्य जनता सुखावलीआहे.

अकोट हे संवेदनशील शहर असल्याने रमजान ईद चा कडेकोट बंदोबस्त तैनात असतांना धारोली वेस भागात ASI महादेव नेवारे, पोलीस कर्मचारी उदय शुक्ला, उज्वला पाठक हे तैनात होते त्यांना, दुपारच्या वेळेस एक 8 वर्षाची लहान मुलगी रडत असलेली दिस.तिला मराठी भाषा समजत नल्याने पोलिसांनी एक कोरकू समाजाच्या व्यक्ती कडून सदर चिमुरडीला बोलते केले असता तिने अडगाव हिवरखेड भागातील तांड्या वरून आल्याचे सांगितले,माञ आई वडिलांची चुकामुक झाल्याने ती आई वडिलांना शोधत होती , ही माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना मिळताच त्यांनी त्वरित हिवरखेड अडगाव भागात तिच्या आई वडिलांचा शोध घेण्यास सांगून सरकारी वाहनाने स्टाफ रवाना केला.दरम्यान पोलीस स्टाफ अडगाव जवळ पोहचला असता पोलिसांच्या सवेदांशीलतेला नशिबाची साथ मिळाली, चिमुरडीचेआई वडील रस्त्यावरच तिला शोधत असताना दिसून आल्यावर चिमुरडीने टाहो फोडला ,पोलिसांनी लगेच आधार कार्ड पडताळून व खात्री करून चिमुरडीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले, तिचे आई वडील मजुरी करणारे आदिवासी कोरकू समाजातील होते, कोणताही अनुचित प्रकार न घडता मुलगी हरविल्याच्या 2 तासात मुलगी परत मिळाल्याने त्यांनी अकोट शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले.दरम्यान शहर पोलीसांच्या या तत्परतेने बेटी बचाव बेटी पढाव सारख्या प्रभावी मोहीमेला हातभार लागला यात शंका नाही.