न्यायालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

0
736
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    चांदूर रेल्वे येथील न्यायालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन नुकतेच तालुका विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले होते.
   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधिश एस. सी. खैरनार, न्या. फक्राबादकर मॅडम , एम. व्ही. देशमुख आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती हेती. यावेळी अॅड. कदम, अॅड. मनिष वाल्दे, अॅड. मकेश्वर, अॅड. जिचकार, अॅड. झाडे यांची भाषणे झाली. मंचावर उपस्थित मान्यवरांनी कायदे विषयक मार्गदर्शन उपस्थितांना केले.
  यावेळी अॅड. ओक, अॅड. मैंद, अॅड. प्रवर्जा चवरे, अॅड. अग्रवाल यांसह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. मकेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. काळे यांनी केले.