शिवानी कोरडेचा भाजपा कार्यकर्त्यांनी केला सत्कार – सरचिटणीस संदिप सोळंके यांचा पुढाकार

0
752
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
        दहावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला. यामध्ये शहरातील श्री. मन्नालाल गुप्ता विद्यालयाची विद्यार्थीनी शिवानी नरेश कोरडे हिने ९४.६० टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून प्रथम आली. त्यामुळे भाजपा सरचिटणीस संदिप सोळंके यांनी पुढाकार घेऊन भाजपाच्या वतीने शिवानी कोरडे हिचा घरी जाऊन सत्कार केला.
        शिवानी कोरडे हिने दहाविच्या परिक्षेत बाजी मारून चांदूर रेल्वे शहराचे नाव जिल्हास्तरावर रोशन केले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी घरी जाऊन शिवानीचा पालकांसह गुणगौरव केला व पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस संदिप सोळंके, जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव ठाकरे, सचिन लांजेवार, मुरलीधर मुंधडा, गुड्डु बजाज, एकनाथ माकडे, अमोल देशमुख, सचिन कासार, केशव वंजारी, मुन्ना शर्मा यांच्यासह शिरजगावचे सरपंच संजय देशमुख आदींची उपस्थिती होती.