संत गजानन महाराज पादुका संथान मुंडगावचा पंढरपूर वारी पालखी सोहळा…

0
2083
Google search engine
Google search engine

आकोट (संतोष विणके )

संत गजानन महाराजांच्या मुळ पादुका असणाऱ्या संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव ता. अकोट जि. अकोला ची पायदळ पालखी दिंडि श्री क्षेत्र मुंडगाव ते श्री क्षेत्र पंढरपुर
दी. १९ जुन २०१८ ला प्रस्थान करणार आहे.दरवर्षी पंढरीच्या वारीत पादुका संस्थानची पालाखी ही सहभागी असते.शेगावच्या पालखी प्रमाणेच पादुका संस्थानच्या पालखीचे देखील ठीकठीकाणी जंगी स्वागत तथा पुजन केल्या जाते.यावर्षी उद्या दि १९ ला पालखी नगर परीक्रमेसह वाजत गाजत टाळ मृदुंगाचा निनादात पंढरीस प्रस्थान करणार आहे. दिंडी सोहळ्यातील मार्गक्रमण व मुक्काम पुढील प्रमाणे असणार आहेत.
दी. २० जुन ला दुपारी वेताळ महाराज देवरी फाटा महाप्रसाद रात्री चोहटटा बाजार महाप्रसाद व मुक्काम
दी. २१ जुन ला हिंगना येथे दुपारी महाप्रसाद
रात्री उगवा येथे महाप्रसाद व मुक्काम
दी. २२ जुन ला अकोट फैल, अकोला येथे दुपारी महाप्रसाद रात्री माहेश्वरी भवन, अकोला येथे महाप्रसाद व मुक्काम दी. २३ जुन दुपारी सोपीनाथ नगर बाळापुर बायपास, अकोला येथे दुपारी एकादशी फराळ रात्री मंगल कार्यालय, जूना चहा कारखाना, डाबकी रोड अकोला येथे फराळ व मुक्काम
दी. २४ जून दुपारी बारा ज्योतिर्लिंग, रनपिसे नगर येथे महाप्रसाद पालखी गौरक्षन रोड मार्गे रात्री श्री कडु यांचे येथे कौलखेडला महाप्रसाद व मुक्काम
दी २५ जून ला चांदुर येथे दुपारी महाप्रसाद
रात्री चिखलगाव येथे महाप्रसाद व मुक्काम पुढे पातुर, वाशिम, हिंगोली मार्गे जाईल.