नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा झाली नाही कार्यवाही,
*कुत्र्यांचा बंदोबस्त लावा अन्यथा तीव्र आंदोलन.*
अमरावती : वरुड नगर परिषद हद्दीत येत असलेल्या नया दायरा परिसरात रहिवासी राहील राणा अ. हबीब यांच्या घराच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालून घराच्या आवारात बांधलेल्या 6 बकऱ्यांवर अचानक हल्ला चढविला असून त्यात 6 ही बकरींचा मृत्यू झाला. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन सुद्धा परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेला दिले, तरी नगर परिषदेचे राजकीय पदाधिकारी व अधिकारी तसेच कर्मचारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत असून यापेक्षा ही मोठ्या घटनेची वाट तर नाही पाहत आहेत, अश्या विविध चर्चा शहरात होत आहे.
मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळातुन झालेल्या नुकसानीबाबत फिर्यादीने पोलीसात तक्रार दाखल केली आहे, रस्त्यावर फिरत असलेल्या मोकाट कुत्र्यांबाबत नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा बंदोबस्त लावला नाही, आता नुकसान झालेल्या घटनेची जवाबदारी नगर परिषदेने घेऊन नुकसान भरपाई भरून द्यावी, त्यासोबतच वरुड नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही यावेळी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.*