प्रकल्पग्रस्तांची भाकरी हिसकावणाऱ्या शासनाच्या विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे भाकर आंदोलन – भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देण्याची मागणी

0
1307
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
           तालुक्यातील सोनगाव शिवणी प्रकल्पामध्ये भुसंपादन केलेल्या जमीनीला २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भाकर आंदोलन सोमवारी दुपारी केले.
           चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव येथील शिवणी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांची शेतजमीन २०१३ चा भूसंपादन कायदा लागू होण्याआधीच तीव्र गतीने अत्यंत कवडीमोल दराने शासनाने पाटबंधारे विकास मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत व कायद्याची भीती दाखवून जबरदस्तीने सरळ खरेदी पद्धतीने फसवणूक करून हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. सरासरी सरळ खरेदी पद्धतीने एक लाख ते दीड लाख प्रती एकर प्रमाणे शेतकऱ्यांना वारंवार १८९४ च्या कायद्याचा उल्लेख करून कलम ४ ची भीती सुद्धा दाखविण्यात आली. तद्वतच २०१३ चा भूसंपादन कायदा पास झाला व निर्माणधीन असलेल्या प्रकल्पांतर्गत उर्वरित शेतकऱ्यांना जमिनीचा दर १४ ते १५ लाख प्रती एकर प्रमाणे भूसंपादन कायद्याच्या अधीन देण्यात आला. यामुळे अनेक शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक झाली आहे. प्रशासनाने याचा जराही विचार केला नसून एकाही जनप्रतिनिधीने या गंभीर समस्येला हात सुद्धा लावलेला नसल्याचे सांगितले. याच्याच विरोधात सोनगाव येथील प्रकल्पग्रस्तांनी त्यांची काळी आई म्हणजेच शेतजमीन १८ जून पासून ताब्यात घेतली असून जोपर्यंत आमच्या समस्यांवर धोरणात्मक निर्णय घेऊन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळणार नाही तोपर्यंत जमिनीचा ताबा सोडणार नाही अशी कणखर भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. यावेळी सोनगाव शिवणी प्रकल्पात  भुसंपादन केलेल्या अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.