डी. बी.पथक संदीप आगरकर यांच्या पथकाची कार्यवाही

0
1105
Google search engine
Google search engine


डी. बी.पथकाची कार्यवाही ,सीसीटीव्ही च्या मदतीने आरोपी 12 तासात जेरबंद
नागपूर बेलतरोडी पोलीस स्टेशन मधील घटना

नागपूर प्रतिनिधी:-

सुधाकर जानराव कुलकर्णी काही कामानिमित्त बाहेर गावी गेले असता त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार त्यांनी नागपूर येथील बेलतरोडी पोलिस स्टेशन मध्ये दिली.तक्रार दाखल होताच डी. बी.पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदीप आगरकर यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी पंचनामा केला आणि त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुजेत निरीक्षन केले असता आरोपी यांचा लक्षात ठेवून परिसरातील असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

आरोपीचा शोध सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की या घटनेतील आरोपी हे वेळहारी गावाच्या मागे असलेक्या झाड झुडपे मध्ये लपलेले आहे.संदीप आगरकर यांनी सापळा रचून त्या आरोप याना ताब्यात घेतले.त्यांच्या कडून चोरी केलेल्या रक्कम पैकी 6700 ,तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोपेड मोटारसायकल क्रमांक MH31 K7568अंदाजित किंमत 30000 जप्त करण्यात आले.या मध्ये अटक केलेले आरोपी अनिकेत उर्फ अण्णा आस्तनकर वय 20 वर्ष प्लॉट नंबर 204 राकेश ले आउट क्रमांक 4 मधील राहणार असून दुसरा आरोपी राहुल उर्फ विशाल शांमचंद्र रॉय वय 22 वर्ष रा.कैकाडी नगर झोपडपट्टी गुलमोहर बार मागे मानिशनगर येथील रहिवासी आहे.यांना अटक करण्यात आली आहे.तसेच त्यांच्यावर 453,380 आणि 34 अंतर्गत गुन्हची नोंद करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही पोलीस उपायुक्त निलेश भरणे ,सहउपआयुक्त पोलीस किशोर सुपारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळवारे ,यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी.पथक प्रमुख संदीप आगरकर,पोलीस हवालदार अविनाश ठाकरे,रणधीर दीक्षित,गोपाल देशमुख आणि त्यांच्या टीम ने केली.