भारतद्वेषी ‘सीआयए’ !

0
803
Google search engine
Google search engine

 

सीआयए’ (सेन्ट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीया अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने या वर्षी प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड फॅक्ट बूक’मध्ये ‘विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल या धार्मिक आतंकवादी संघटना आहेततर जमियत उलेमाहिंद ही धार्मिक संघटना आहे’असा उल्लेख केला आहेयाला ‘फॅक्ट’ म्हणण्यापेक्षा ‘फेक अ‍ॅलिगेशन्स’ म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेलयाचा शासन स्तरावर ठोस प्रतिवाद होणेतर अपेक्षित आहेचपण विदेशी यंत्रणांच्या मनमानी आरोपांना कायदेशीर लगाम बसणेही आवश्यक आहे

       कुठल्याही देशाची जागतिक गुप्तचर यंत्रणा मानवतेच्या प्रेरणेने काम करत नसतेअमेरिकेची गुप्तचर यंत्रणा तर नाहीच नाहीदेशांतर्गत आणि परदेशातील गुन्हेगारशत्रूच्या कारवाया यांवरतसेच अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी या संघटना कार्यरत असतात. ‘सीआयए’ या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेची तर स्वतःचीच अशी एक आतंकी पार्श्‍वभूमी आहेवर्ष १९८० ते १९८९ च्या काळात जेव्हा सोव्हिएत युनियन आणि अफगाणिस्तान यांमधील युद्धामध्ये अफगाणिस्तानचा पाडाव होत सोव्हिएत युनियन प्रभावी होत चालली होतीतेव्हा याच ‘सीआयए’ने अफगाणी आतंकवाद्यांना (मुजाहिदींनाघातक शस्त्रास्त्रे पुरवलीकेवळ शस्त्रास्त्रे पुरवली नाहीततर ते वापरण्याचे प्रशिक्षणही दिलेओसामा बिन लादेनला सर्वार्थाने ‘मोठे’ करण्यात सीआयएचा महत्त्वाचा वाटा होता.

      याच गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानातील जिहादी संघटनांना मुक्तहस्ते सहकार्य केलेओसामा बिन लादेन याचा सहकारी असलेल्या हक्कानी याचे पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क आणि अल्कायदा यांची स्थापना आणि वाढ होण्याला ‘सीआयए’ कारणीभूत होतीअमेरिकेने पोसलेला आतंकवाद जेव्हा त्यांच्यावरच उलटला आणि ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर आतंकवादी आक्रमण झालेतेव्हा मात्र अमेरिकेने ‘आतंकवादमुक्ती’चे नारे द्यायला प्रारंभ केलेया सूत्रावरून वरकरणी का असेना जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितलेतेव्हा ‘हक्कानी नेटवर्क हे तर ‘सीआयए’चे लाडके अपत्य आहे’अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानने केली होतीजी संघटना कुख्यात आतंकवादी हाफीज सईदला संरक्षण देतेआतंकवादाचे उगमस्थान असलेल्या पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचे अर्थसाहाय्य करतेत्यांनी भारतातील राष्ट्रनिष्ठ संघटनांना आतंकवादी म्हणण्याचा शहाणपणा करू नये

सीआयए’चा भारतद्वेष आणि हिंदूद्वेष !

        ‘सीआयए’ने तिच्या संकेतस्थळावर जगभरातील देशांचा इतिहासतेथील लोकसरकारेअर्थव्यवस्थाऊर्जाभूगोलदळणवळणजनसंपर्कसैन्य आणि अशा अनेक गोष्टींची माहिती दिली आहेभारताच्या इतिहासाविषयी माहिती देतांना ‘आर्यद्रविड’ वादाचा संदर्भ दिला आहेजम्मूकाश्मीरमधील काही भाग भारतातून वगळून भारताचा विकृत नकाशा प्रसिद्ध केला आहेभारतातील काही वास्तूंच्या दर्शवलेल्या छायाचित्रांमध्ये प्रामुख्याने इस्लामी वास्तूंचा समावेश केला आहे

      आज संपूर्ण विश्‍व तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून त्याचा भडका कधी उडेलते सांगता येणार नाहीतीव्र झालेली अण्वस्त्र स्पर्धाच त्याला कारणीभूत ठरणार आहे. ‘आम्ही अण्वस्त्रे निर्माण करणारमात्र अन्य देशांनी ती करू नये’या वृत्तीतून अमेरिकेने अण्वस्त्र निर्मितीवर निर्बंध घातले.काही देशांवर उघडपणेतर काही देशांवर छुप्या पद्धतीने इतर देशात कार्य करून त्यांच्या देशाच्या शत्रूच्या विरोधकांना संपवण्यासही हे गुप्तहेर मागेपुढे पहात नाहीतज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉहोमी भाभा भारतासाठी लाभदायक पर्यायाने अमेरिकेसाठी ‘धोकादायक’ असल्याने ‘सीआयए’ने डॉभाभा यांच्या विमानाचा अपघात घडवून आणलाअशी धक्कादायक माहिती TBR News या संकेस्थळाने उघड केली होतीअशा भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी संघटनेच्या मनमानी निष्कर्षांना भीक न घालता त्याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले जाणे अपेक्षित होतेपण दुर्दैवाने ते शासनस्तरावरून ते मिळाले नाही… आरोप झालेल्या संघटना सध्याच्या सरकारच्या पितृसंघटनेच्या कुळातील असूनही !

हिंदुत्वाचा बुलंद आवाज

      गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये एकीकडे हिंदुत्व बळकट होत असतांना दुसरीकडे त्याला होणारा विरोधही वाढत आहेत्यामुळेच हिंदुविरोधकांनी ‘सीआयए’ची ही पूर्वग्रहदूषित सूत्रे डोक्यावर घेतली आणि हिंदुत्वविरोधाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न केलाज्याप्रमाणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत्याप्रमाणे राष्ट्रनिष्ठ संघटनांना कुणी आतंकवादी संघटना म्हणल्याने त्या तशा ठरत नाहीतविश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल या दोन्ही संघटना देशातील हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी आणि धर्मरक्षणासाठी प्रयत्नशील आहेतअशा संघटनांचा जगातील एका बलाढ्य देशाची गुप्तचर यंत्रणा नोंद घेतेहे हिंदुत्वाचा आवाज बुलंद होत असल्याचेच लक्षण आहेयाच आवाजामुळे कदाचित् ‘सीआयए’च्या उलट्या बोंबा बंद होतील 

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था