वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराने कर्जाला कंटाळून आपल्याच दोन चिमुरड्यांना गळा आवळून ठार केले

0
871
Google search engine
Google search engine
हैदराबाद – सिद्दीपेट जिल्हयात एका तेलगू वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराने कर्जाला कंटाळून आपल्याच दोन चिमुरड्यांना गळा आवळून ठार केले व त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले आहे. श्री हनुमंत राव (३५) असे या पत्रकाराचे नाव आहे. तर मीना (३०) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.
हनुमंत जी एका स्थानिक तेलगू वृतपत्रात काम करत होता. पत्नी व दोन मुलं असे त्याचे सुखी कुटुंब होते. पण पगार पुरत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असे.