१३ कोटींचे उद्दिष्ट : ७ लाखांहून अधिक वृक्षलागवडीसाठी मोर्शी – वरुड सज्ज.

0
854
Google search engine
Google search engine

पर्यावरण रक्षणाच्या लोकोत्सवात प्रत्येकांनी सहभाग घ्यावा. – आ.डॉ.अनिल बोंडे

श्री संदीप बाजड /
मोर्शी (अमरावती) : लोकांनी ठरवलं तर ते पर्यावरण रक्षणाच्या कामात किती उत्तम योगदान देऊ शकतात हे मागील दोन वर्षात लोकसहभागातून झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातून दिसून आलं. हजारो हातांनी अगदी उर्त्स्फूतपणे गाव-शिवारात, वाडी-वस्तीत झाडं लावली. वन विभागाच्या वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त शासनाचा न राहता तो लोकांचा झाला. राज्यभरात मागील वर्षी वृक्षलागवडीचा लोकोत्सव साजरा झाला. आता १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ही संधी पुन्हा सर्वांना उपलब्ध होणार आहे. राज्यात लागणार आहेत तब्बल १३ कोटी झाडं लावण्याचा मानस महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून त्यापैकी ७ लाख महावृक्षलागवड मोर्शी – वरुड तालुक्यात होणार आहे. विविध प्रजातींची रोपं. ज्याला जे झाड आवडते त्याने त्या प्रजातीचे रोप लावायचे… पण रोप लावायचे आणि वृक्षलागवड कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून, यावर्षी हि पर्यावरण संरक्षणाचा दूत व्हायचं असे प्रतिपादन मोर्शी येथील वृक्ष लागवड आढावा बैठकीच्या व्यासपीठावरून वरुड – मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांनी बोलतांना व्यक्त केले.

यावेळी आढावा बैठकीला मोर्शीचे उपविभागीय अधिकारी मनोहरराव कडू, मोर्शी महावितरणचे उपअभियंता शामल भाले, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी सातपुते, वरुडचे तहसीलदार आशिष बिजवल, पंचायत समितीचे सभापती शंकर उईके, उपसभापती सुनील कडू, जिल्हा परिषद सदस्य प्रा.संजय घुलझे, प्रा.अनिल डबरासे, सारंग खोडस्कर, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, वरुड आत्मा अध्यक्षा शालिनी चोबितकार, मोर्शी आत्मा अध्यक्षा देवकुमार बुरंगे, न.प. मोर्शीच्या अध्यक्षा शिला रोडे, उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम तसेच शासकीय अधिकारी दे.म.सोनारे, शिवराय पवार, विनोद पवार, नितीन ठाकरे, प्र.वा.देशमुख, संदीप मडावी, सुनील भालतिलक, एन.जी.भुसारी, व्ही.आर.काळे, के.आर.अलकरी, पी.व्ही.कुलदिवार, जि.पी.तिवासे, वाय.व्ही.संगेकर, वी.एम.सोरवे, व्ही.व्ही.बिहाडे, पी.यु.सोळंके, डी.एम.तीखे, आर.जि.इंगोले, आर.आर.माळवे, एन.एम.सुपले, प्र.प्र.चव्हाण, कु.मंगला सोमवंशी, अमोल तायडे, प्रदीप महल्ले, एस.एस.भिवगडे, विलास आठवले, एस.एस.सुपे, प्रकाश फुसे, चंद्रकांत ईश्वरकर, दिपक दवंडे, संजय मेश्राम, अमोल गेडाम, स्वप्नील अळसपूरकर, सुनील घोडीले, एस.डब्ल्यु.देशमुख, एच.ए.मंगळे, राहुल वानखडे, सतीश लेकुरवाळे, जिल्हा आत्मा सदस्य प्रवीण कुंडलकर, नगरसेवक दिपक नेवारे, नितीन राऊत, हर्षल चौधरी तसेच अशोक ठाकरे, राहुल चौधरी, विलास आघाडे, प्रा.दिनेश शर्मा, निलेश चौधरी, किर्तेश शर्मा, विनोद पाचघरे, सौ. कल्पना देशमुख, प्रतिभा राऊत, सुनीता कुंभरे, भास्कर पाटील, प्रमोद बोबडे, यादवराव चोपडे, विजय सितकरे, अनिल दरवाई, प्रवीण राऊत, जुबेर पटेल, दिपक घाटोळ, मनोज माहुलकर, डॉ.शशिभूषण उमेकर, राहुल पाटील, आसिफ खान सरदार खान, आरिफ खा. इब्राहीम, शंकरराव चोबितकर, प्रितम अब्रुक, हर्षद रक्षे, मनोज तायवाडे, प्रवीण उर्फ गोलू मानकर यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील १३ कोटी महावृक्षलागवड कार्यक्रमासाठी उंच वाढलेली, उत्तम दर्जाची रोपं उपलब्ध व्हावीत म्हणून वन विभागाने अतिशय नियोजनपूर्वक पावले टाकली. राज्यात सामाजिक वनीकरण शाखा, वन विभाग, वन विकास महामंडळ, वन्यजीव मंडळ यासारख्या विविध यंत्रणांनी त्यांच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका विकसित केल्या. यामध्ये सामाजिक वनीकरण, वन विभागाच्या खत्यारित अनेक रोपवाटिका असून त्यासोबतच वनविकास महामंडळाच्या अनेक रोपवाटिका आहेत. रोपं लावू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाला रोपं मिळेल इतकी रोपं मोर्शी – वरुड तालुक्यात उपलब्ध आहेत. यात इमारतीसाठी लागणाऱ्या लाकूड प्रजातीची रोपं आहेत, बांबूच्या विविध प्रजाती तसेच वड, पिंपळ, कडूनिंब, बेहडा, चिंच, मोह या प्रजाती आहेत, फळझाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, धार्मिकदृष्टया महत्वाची आणि मागणी असलेली रोपं देखील या रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ वृक्ष प्रजातींचाही यात समावेश आहे.

राज्यात सध्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी २४ कोटी ६७ लाख रोपे उपलब्ध आहेत, जिल्ह्यातील जिल्हा वन अधिकारी व मोर्शी – वरुड तालुका वन अधिकाऱ्याच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्याकडे जाऊन वृक्ष लावणाऱ्यांनी आपली माहिती नोंदवावी. वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या वृक्ष लागवडीची नोंद वन विभागाकडे करता यावी यासाठी “माय प्लांट” नावाचे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे, असे हि माहिती आढावा बैठकीतून देण्यात आली.