कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विठोबाजी घटारे यांचे निधन

0
854
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांच्या फळीतील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेले तालुक्यातील पळसखेड येथील रहिवासी विठोबाजी बाकारामजी घटारे (वय ९४) यांचे वृध्दपकाळाने गुरूवारी निधन झाले.
      विठोबाजी घटारे यांनी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात सिलिंग जमीन वाटपाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. ते पळसखेड येथील पत्रकार अमर घटारे यांचे आजोबा आहे. त्यांच्या मागे २ मूले, नातवंडासह बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरूवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.