सुपलवाडा येथे दूषित पाण्यामुळे ४२ लोकांना अतिसाराची लागण ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा

0
1037
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
    जेम-तेम पूर्ण पावसाळा लागलेला नसून सध्याच तालुक्यातील सुपलवाडा ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे ४२ लोकांना अतिसाराची लागण झालेली आहे. पाईपलाईन लिकेजमुळे बाहेरील दुषीत पाणी मिसळल्यामुळे अतिसाराची लागण असल्याची माहिती मिळाली आहे. रूग्णांवर तातडीने उपचार केल्या जात आहे.
      प्राप्त माहितीनुसार चांदूर रेल्वेवरून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपलवाडा येथे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे बाहेरील दूषित पाणी शुध्द पाण्यात मिसळल्यामुळे शासकीय घरकुलामध्ये राहणाऱ्या ४२ वरून अधिक नागरिकांना हगवन, उलट्या सारख्या अतिसाराची लागण झाल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. अतिसाराची माहिती मिळताच प्राथमिक रुग्णालयाची चमू, आरोग्य विभागाचे अधिकारी – कर्मचारी यांनी या गावात धाव घेऊन स्थानिक जिल्हा परिषद शाळेत कँप उभारूण उपचार सुरू केले. यामध्ये चांदूर रेल्वे येथील रूग्णालयात २५ रूग्णांना तर अमरावतीच्या सामान्य व खाजगी रूग्णालयात नक्ष कुंभारे (४), शेख आयान शेख अफसर (४), राहुल गायधने (२७), अंकिता यशवंत खवसे (२०) यांसह इतरांना दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.
    सदर बाब पूर्णता ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला असून ग्रामसेवक तथा सरपंच यांनी लिकेज झालेले पाईपलाईन तातडीने दुरुस्त करावी तसेच ब्लिचिंग पावडर वेळेवर टाकी टाकावे कारण सध्या पावसाळा तर जेमतेम सुरू झालेला आहे, अशी मागणी करण्यात आली आह. आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली, यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. चांदूर रेल्वेचे तहसिलदार राठोड, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींनी भेटी दिल्या व वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या. आता बऱ्याच रुग्णांना येथून उपचारानंतर सुटी देण्यात आलेली आहे.