जि. प. म.गांधी विद्यालय ,हिवरखेड ची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

0
830
Google search engine
Google search engine

जि. प. म.गांधी विद्यालय ,हिवरखेड ची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
तेल्हारा प.स अंतर्गत येत असलेल्या जि. प.म.गांधी विद्यालयाची 10 वि उत्तीर्ण निकालाची परंपरा याही वर्षी कायम होती.
विदलयात मागील 3 वर्ष्या पासून केंद्र शासन आणि राज्य शासन पुरस्कृत रिटेल आणि हेल्थकेअर हा व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू झाला आहे.हा अभ्यासक्रम फक्त सरकारी शाळेमध्येच आहेत.या द्व्यारे विद्यार्थ्यांना रोजगार व नोकरीची संधी सुध्दा मिळते.हा अभ्यासक्रम परिसरातील एकमेव जि. प.शाळेत सुरू झाला आहे.या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनि लाभ घ्यावा.या विषयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.तर विद्यालयातून रिटेल या विषयामध्ये कु.वृषाली प्रल्हाद राऊत हिला 100 पैकी 99गुण आणि एकूण 92 टक्के तर कु.कोमल अरुण ताळे हिला100 पैकी94 गुण आणि हेल्थ केअर या विषयामध्ये तेजस रेखाते यास 100पैकी 89 गुण मिळाले .तर निलेश मनोहर ताळे यास 100 पैकी 88 गुण मिळाले राष्ट्रीय कौशल्य विकास अंतर्गत येणाऱ्या विषययात विद्यार्थ्यांनि सुयश प्राप्त केल्याबद्दल पालक ,विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला.विद्यालयातील एकूण 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 13 विद्यार्थी प्रविण्या श्रेणीत 40विद्यार्थी प्रथम श्रेणीत 46 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
मुख्याध्यापक प्रा.देशमुख वर्गशिक्षक,विषय शिक्षक ,व्यवसाय शिक्षक श्री.संदेश वईलकर ,(रिटेल) ,कु. गावंडे मॅडम(हेल्थ केअर)यानी यशस्वी विद्यार्थी चे अभिनंदन करून कौतुक केले.
विधर्थिनीं आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना देतात .ग्रामिण परिसरातील विधर्थ्यानी जिद्द ,मेहनत व आत्मविश्वास ने मिळालेल्या यश बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे….