वाढदिवसाच्या भेट स्वरूपात महाराष्ट्राचे कृषीमंत्रीपद अरूण अडसड यांना द्यावे – चांदूर रेल्वे तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी

0
1689

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

        विदर्भाच्या मातीशी नाळ जुळलेल्या शेतीनिष्ठ व्यक्तीची कृषीमंत्री पदावर वर्णी विदर्भातुनच लागावी अशी मागणी चांदूर रेल्वे तालुक्यातून भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

     राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मीत निधनामुळे कृषीमंत्री पदाची जागा रिक्त झाली आहे. मागिल वर्षात विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधित आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या विविध पॅकेजचा लाभ अजुनही विदर्भातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेला नाही.  ही विदर्भाची वस्तुस्थिती आहे. विदर्भात भाजप पक्ष पोहचविण्याचे काम मोजक्या नेत्यांनी केले. त्या काळात पेटविलेल्या मशालीमुळे आज विदर्भात भाजपाला अच्छे दिन पहावयास मिळाले आहे. आयुष्यभर त्याग करणाऱ्या व भाजपाची सत्ता असल्याने शेतकऱ्यांशी निगडीत व त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या अरूण अडसड यांना कृषीमंत्रीपद दिल्यास विदर्भातील निष्ठावंत कार्यकर्ते व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे विदर्भाची बुलंद आवाज, भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार अरूण अडसड यांना १ जुलैला असणाऱ्या वाढदिवसाची भेट म्हणुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्रीपद द्यावे मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशुतोष उर्फ पप्पु गुल्हाने, शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील (चौधरी), बबनराव गावंडे, नंदकिशोर काकडे, नरेंद्र सव्वालाखे, डॉ. हेमंत जाधव, उत्तमराव ठाकरे, संदिप सोळंके, छोटुभाऊ विश्वकर्मा, गुड्डु बजाज, जिल्हा कार्यकारीणी सदस्य प्रमोद नागमोते, बाळासाहेब सोरगिवकर, धिरेंद्र खेरडे, उमाकांत जमदापुरे, रविंद्र उपाध्याय, केशव वंजारी, लोकेश माकोडे, श्री. गणेडीवाल, सचिन लांजेवार, मुरलीधर मुंधडा, संजय देशमुख, गटनेता संजय मोटवानी, अजय हजारे, विलास तांडेकर, संजय पुनसे, ज्ञानेश्वरराव मालखेडे, अमोल अडसड, सौ. शितल गायगोले, डॉ. सौ. सुषमा खंडार, सौ. लता बागडे, सौ. अपर्णा जगताप यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी केली आहे.