लासलगाव येथे शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

0
1513
लासलगाव (उत्तम गिते)

लासलगाव येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न झाला.
लासलगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवप्रतिमेचे पूजन अशोक आबा होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर समस्त शिवप्रेमींनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवरायाना वंदन केले. यावेळी “जय भवानी,जय शिवाजी”,“हर हर महादेव”,“छत्रपती शिवाजी महाराज कि जय”अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी चौक परिसर दणाणले.
या सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात शिवप्रेमींनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी लासलगाव शिवसेना शहर प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील,भाजप चे शहर अध्यक्ष रवींद्र होळकर,आप्पासाहेब गवळी,राजेंद्र चाफेकर,डॉ अनिल बोराडे,अमित गंभीरे,बाळासाहेब शिरसाठ,दत्ता पाटील,विलास गुंड पाटील,भरत पाटील,मनीष भावसार,अमित बकरे,महेश चव्हाण,मंदार खानापूरकर,तेजस कुलकर्णी,महेश होळकर,भैय्या भंडारी,बाळासाहेब होळकर,महेश मोरे,संदीप उगले,सचिन लचके,योगेश हिंगमोरे,बाळासाहेब मोरे,सागर वाघ सह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.