अहेरी होणार वायफाय……नगरी ><पालकमंत्र्यांनी अहेरी नगर पंचायतीला मंजूर केले 1.5 कोटी रुपये

0
849
Google search engine
Google search engine
मोफत वायफाय असलेली महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत
अहेरी नगर पंचायतला पालकमंत्री मा.ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नुकताच मोफत वायफाय ह्या सुविधेसाठी 1.5 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, ह्या निधीतून पुढील 3 वर्ष अहेरीकरांना वायफायच्या माद्यमातून मोफत इंटरनेट सेवेचा आनंद उपभोगता येणार आहे,ह्या सोबतच पूर्ण महाराष्ट्रात मोफत वायफाय सुविधा देणारी अहेरी नगर पंचायत ही पहिली नगर पंचायत ठरणार आहे.

सद्या डिजिटल युग आहे त्यामुळे इंटरनेटला अनन्य साधारण महत्व आहे, इंटरनेट शिवाय काहीही करणे सद्या शक्य होत नाही, सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालये,बँका,शाळा व कॉलेज तसेच सेतुमद्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो सोबतच सामान्य नागरिक व विद्यार्थीही इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, हे लक्षात घेऊन पालकमंत्री साहेबांनी सर्वांच्या सुविधेसाठी अहेरी नगर पंचायतला मोफ़त वायफायसाठी 1.5 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिला आहे..
ह्याच अनुषंगाने नुकताच एका चमूने अहेरी राजनगरीत मोफत वायफाय ह्या सुविधेसाठी पूर्ण सर्वेक्षण करून शहरातील 17 प्रभागात एकूण 22 पाइंटची निवड केली असून त्या माध्यमातून अहेरीकरांन्ना मोफत इंटरनेटची सुविधा मिळणार आहे, ह्या मोफत वायफाय सुविधेमुळे अहेरी शहरातील विविध ठिकाणी सद्या लागून असलेल्या C.C. TV कॅमेरे ही चालू होणार असल्याने अहेरीकरांमद्ये सद्या आनंदाचे वातावरण आहे.