ढोले कॉम्पलेक्स मधील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला लागली आग – लाखोंचे नुकसान – शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा अंदाज

0
837
Google search engine
Google search engine
(फोटो – शहेजाद खान) 
चांदूर रेल्वे  –
     चांदूर रेल्वे शहरातील मुख रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात सोमवारी रात्री ८.५५ च्या सुमारास आग लागल्याने दस्ताऐवजासह साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.
     शहरातील ढोले कॉम्पलेक्समधील ढोले हॉस्पीटलच्या वर पहिल्या मजल्यावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय आहे. सोमवारी रात्री ८.५५ च्या सुमारास कार्यालय बंद असतांना अचानक आग लागली. सदर बाब सर्वप्रथम डॉ. क्रांतिसागर ढोले यांच्या लक्षात आली. त्यांनी काही सहकाऱ्यांसह पहिल्या मजल्यावर धाव घेतली. सहकाऱ्यांनी कुलुप तोडुन आत प्रवेश केला. डॉ. क्रांतिसागर ढोले यांच्यासह शहरवासीयांच्या मदतीने पाणी टाकुन सदर आग आटोक्यात आणली. यानंतर ३० मिनीटानंतर नगर परीषदेची अग्नीशमन दलाची गाडी पोहचली. परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आली होती. यानंतर राहिलेली आग अग्नीशमन दलाच्या चमुने विझविली. या आगीत ३-४ कॉम्प्युटर सिस्टिम, प्रिंटर, खिडक्या, ३ कपाट, ३ टेबल व इतर फर्निचर जळाल्याने अंदाजे लाखोंचे नुकसान झाले आहे.
तसेच यामध्ये दस्ताऐवज मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला. सदर आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आग लागताच शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती उपकार्यकारी अभियंता बिजवे, शहर विभागाचे अभियंता चौधरी, अभियंता मेश्राम,कनिष्ठ अभियंता नईम खान व इतर विद्युत वितरण कंपनीचे सर्व कर्मचारी यांनी कार्यालयात धाव घेतली होती.
    सदर घटनेबाबत उपकार्यकारी अभियंता बिजवे यांनी तातडीने वरिष्ठांना शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीची माहिती दिली. वृत्तलीहोस्तर शहरात अंधार होता व आग पुर्णत:आटोक्यात आली होती. या आगीत कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही.