योगक्रिया व योग प्रात्यक्षिक प्राणायाम केल्यास आरोग्य सुधारेल – सौ. स्वाती मेटे >< आर्ट ऑफ लिविंग यांच्या विद्यमाने योगक्रिया प्राणायाम शिबिर संपन्न

0
911
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने दररोज एक तास योगक्रिया, योगासने व प्राणायम करणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रत्येक मनुष्याला शांती व उत्तम आरोग्य लाभू शकेल. प्रत्येक स्त्री-पुरुषांना जर आपले आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर प्राणायाम, योगक्रिया, योगासने करणे गरजेचे आहे असे मत प्रभाग क्र. ७ च्या नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांनी केले. त्या शहरातील मेटे कॉलनी येथील कृष्ण मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री श्री रविशंकर द्वारा संचालित आर्ट ऑफ लिविंग यांच्या विद्यमाने योगक्रिया प्राणायाम शिबिरात बोलत होत्या.

सदर शिबिरात योग शिक्षिका सौ. वनिता वाट यांनी योगक्रिया व प्राणायाम प्रात्यक्षिक शिबिरार्थींना करून दाखविले. या शिबीरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक निलेश कापसे ,नगर परिषद आरोग्य निरीक्षक नितीन इमले, जितेंद्र कर्से व इतर कर्मचाऱ्यांसह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्र. ७ च्या नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांनी केले होते. सौ. मेटे यांनी प्रभाग क्र. ७ मध्ये श्री श्री रविशंकर यांचे आर्ट ऑफ लिविंग शिबिराचे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा आयोजन केले आहे.