महावितरण आणि मीटर रीडिंग एजन्सी कडून चांदुर बाजार येथे ग्राहकांची लूट

0
739
Google search engine
Google search engine

महावितरण आणि रीडिंग एजन्सी चे साठे लोटे,ग्राहकांना चुकीच्या रीडिंग चे बिल,फक्त कार्यवाही करणारं नावालाच,

चांदुर बाजार :-

ग्राहकाचे समाधान व्हावे हे नेहमी महावितरण कडून सांगितले जाते.मात्र चांदुर बाजार तालुक्यात मीटर रीडिंग एजन्सी कडून ग्राहकांची लूट होत आहे.याची सत्यता माहिती असूनही महावितरण कार्यलाय मधील अभियंता माहिती नसल्याची भूमिका घेऊन एजन्सी वर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.

100%मीटर चे वाचन करणे,तसेच रिडींग चे योग्य वाचन करणे या मध्ये जर काही मीटर वाचन करणाऱ्या व्यक्ती कडून चूक झाल्यास आणि चुकीचे रीडिंग बिलावर आल्यास ग्राहकांना त्रास झाल्यास तात्काळ संबंधित एजन्सी आणि मीटर वाचन करणाऱ्या व्यक्ती वर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी अमरावती जिल्हावार 2016-17 च्या दरम्यान सुरुवातीला असताना दिले होते.मात्र महावितरण कार्यकाल आणि मीटर रीडिंग एजन्सी यांच्या सगमताने ग्राहकांची लूट चांदुर बाजार तालुक्यात तसेच ग्रामीण भागात होत असल्याचे चित्र आहे.

महावितरण ने सर्व आपले व्यवहार ऑनलाईन केले.त्यामुळे मीटर वाचन हे मोबाइल वरच घेणे सुरू आहे.मात्र मीटर रीडिंग एजन्सी चे खाजगी कर्मचारी हे स्वतःला अभियंता समजतात आणि ग्राहकाला दिशाभूल करणारी माहिती देऊन आपला बचाव कसा करता येईल हे पाहतात.तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागाच्या ग्राहकाच्या देयकावर घेतलेल्या मीटर चे फोटो त काहीच दिसत नाही त्यामुळे मीटर वाचन करणाऱ्या रीडर ने कसचे रीडिंग घेतले हे अस्पष्ट आहे.तर त्याच्या वर कार्यवाही करणे सोडून महावितरण कार्यलाय त्यांना जवळ करत असल्याचे चित्र तालुक्यातील उपकार्यकरी अभियंता कार्यालय आणि इतर सेंटर वर दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी घाटलाडकी येथील ग्राहकांना चुकीच्या रीडिंग चे बिल देण्यात आले होते.या संबंधित चार्ज वर असलेले उपकार्यकरी अभियंता विपुल बनवारे यांनी संबंधित मीटर रीडिंग वर कार्यवाही करण्याचे सांगितले होते.त्यांनी कार्यवाही तर केलीच फक्त नाममात्र.त्यामुळे आता कुंपण च तर शेत कमी नाही करत आहे ?अशी चर्चा चांदुर बाजार तालुक्यात रंगली आहे.

शेतकरी यांच्या प्रशवर आक्रमक असणारे कोणतेही राजकीय पक्ष हा प्रश्न का उचलत नाही अशी चर्चा सुद्धा जोर धरत आहे.तालुक्यात सर्वात जास्त शेतकरी वर्ग असल्याचे मीटर वाचनात घोळामुळे त्यांना वारंवार महावितरण चे कार्यलाय ठोठावे लागत आहे.त्या ठिकाणी गेल्यावर ही त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक मिळत नसल्याची चर्चा सुरू आहे.आता लोकप्रतिनिधी या कडे किती तत्परतेने लक्ष देतील हा प्रश्न अजून उभाच आहे.