वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरीता ९१ टक्केे जमीन संपादीत ><  भू-धारकांना ३३८ कोंटींचे वाटप

0
1702

यवतमाळ :-

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्ह,यातील १०३८.१८ हेक्ट्र जमीन संपादित करण्यायत आली आहे. ही टक्केवारी 91 असून लवकरच संपूर्ण जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून भू-धारकांना ३३८ कोटी 33 लाख रूपयांचे वाटप करण्या त आले आहे.
या रेल्वेह प्रकल्पामतील पहिला टप्पा3 वर्धा ते यवतमाळ मार्गावरील जमीन संपादीत करण्यााचा आहे. हा टप्पाल पूर्ण करण्यामत आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पक जवळपास ३ हजार १६८ कोटी रूपयांचा असून यवतमाळ पर्यंतची संपूर्ण जमीन रेल्वें विभागाला हस्तांयतरीत करण्यांत आली आहे. पुढील जमीन हस्तां्तरीत करण्यापचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, दारव्हाम, पुसद, दिग्रस, उमरखेड या सहा तालुक्यातील एकूण ११४४ हेक्टर ८५ आर जमीन संपादित करण्यांत येणार आहे. यापैकी १०४३.१८ हेक्ट्र म्हजणेजच ९१ टक्केळ जमीन संपादीत करण्याचत आली आहे. यवतमाळ जिल्हडयात या रेल्वेज मार्गाची लांबी १८४ किलोमिटर आहे. सदर मार्ग ९५ गावांमधून जाणार असल्यायने शहरासह् ग्रामीण परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे फार मोठे योगदान लाभणार आहे. या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. व्यापारासोबतच शिक्षण व अन्य क्षेत्रातील विकासालाही हा मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्हरयातील भू-संपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने आपले काम त्वरीत सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यरमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरणार
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग हा यवतमाळ जिल्ह यातील शेतकरी, व्याअपारी, लहान-मोठे व्याावसायिक यासोबतच शिक्षण व आदी बाबींसाठी महत्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच उद्योगांना अनुकूल वातावरण असून रेल्वेमुळे उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी निर्माण होईल.
तालुका गावांची संख्याी एकूण क्षेत्र(हेक्टसर आरमध्येष) संपादित क्षेत्र (हे.आरमध्ये् ) टक्केेवारी
यवतमाळ 15 219.69 219.69 100
कळंब 12 216.47 216.47 100
दारव्हा 21 192.72 173.38 89.96
पुसद 18 285.77 239.30 83.73
दिग्रस 13 191.10 191.10 100
उमरखेड 16 139.10 110.20 74.4
एकूण 95 1144.85 1043.18 91