14 संचालक याना अखेर जामीन मंजूर,

0
1367
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथील अखेर त्या 14 कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सदस्य याना जामीन मंजूर,उशिरा पर्यत चालली न्यायालयीन प्रकिया, इतर संचाकल अजून पर्यत चौकशी च्या घेऱ्यात
पोलिसांनी मागितला होती चार दिवसापर्यंत पोलीस कोठडी,तालुक्यातील संपूर्ण सहकार क्षेत्र न्यायालयात,पोलिसांचा सुरक्षा च्या दृष्टीने चोख बंदोबस्त

चांदुर बाजार:-

दिनांक 10 जून ला अवैधरित्या होत असलेल्या गौवंश वाहतूक वर चांदुर बाजार पोलिसांच्या धडक कार्यवाही मुळे संपूर्ण सहकार क्षेत्र हादरले ची चर्चा सुरू होती.यातच बुधवार ला चांदुर बाजार पोलिसांनी बाजार समिती च्या 20 ही संचालक यांच्या चौकशी अंती गुन्हे नोंदविण्यात आले आणि त्यापैकी 14 संचालक याना तात्काळ अटक सुद्धा करण्यात आली.
त्या सर्व 14 संचालक याना आज गुरुवार रोजी चांदुर् बाजार न्यायालयात सुमारे दुपारी 3 च्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त मध्ये हजर करण्यात आले होते.यावेळी बचाव पक्षाचे कडून 3 वकील यांनी युक्तिवाद सुचविला.यात सरकारी वकील यांनी पोलीस बाजू मांडत 4 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती.मात्र न्यायालयाने ती नाकारली असल्याचे दिसून आले. त्यांना एमसीआर मिळाला होता. मात्र बचाव पक्ष च्या वकिलाच्या युक्तिवाद मुळे त्याना काही अटीवर जमनात देण्यात आली.

कृषि उत्पन्न बाजार समिती मधील 3 महिला संचालक आणि 3 जेष्ठ संचाकल हे चौकशी मध्ये असल्याची माहिती पोलीसाच्या विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.या मध्ये त्यांना समस पत्र देण्यात आल्याचे प्राथमिक माहिती मिळाली.

तसेच या वेळी तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या सर्वांवर कायदा आणि सुव्यवस्था च्या दृष्टीने अमरावती येथील दंगा नियंत्रक पथक क्रमांक 1 तैनात करणयात आले होते.तसेच स्थानिक पोलीस स्टेशन मधील सहायक पोलिस निरीक्षक सलीम चव्हाण,पोलीस कॉस्टबल पंकज फाटे,निलेश डांगोरे,निकेश नशीबकर ,किरण भाबल यांनी आपली जबाबदारी चोख पणे पार पाडली असल्याचे दिसून आले.सदर कार्यवाही ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.