*सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते महाराष्ट्र अभिमान गीताचे लॉंचिंग*

0
1238
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी / पुणे –

महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि मराठी मातीला अभिवादन करणारे महाराष्ट्र अभिमान गीताचे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते लॉंचिंग झाले.

श्री ज्ञानोबा,तुकोबाराय अशा संतांच्या मधुर अभंगवाणीने समृद्ध झालेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने साता समुद्रापार गेलेल्या मराठीचे गोडवे गाणारे हे गीत आहे.सर्वांनी ते पहावे आणि ऐकावे असे यावेळी सुबोध भावे यांनी सांगितले.

या गीताला शब्दबद्ध केले आहे गायक सागर उपासे यांनी, संगीत दिले आहे सनी देशमुख यांनी तर स्वरसाज चढवला आहे प्रविण काटे,विजय सोनवणे, अनिकेत एन.सागर उपासे,रिद्धी बाकरे आणि सनी देशमुख या सर्व युवा गायकांनी.

या गाण्याचे व्हिडीओ चित्रण केले आहे सागर सायाळ यांनी,संकलन केले आहे अनिकेत.एन यांनी तर या व्हिडीओ मध्ये वीरा मोरे,ऋषिकेश उपासे, ऋतुजा उपासे,निहार कणसे आणि यशराज सोनवणे या बाल कलाकारांनी अभिनय केला आहे. नुकत्याच भक्तिमय पंढरपूर वारीच्या कालावधीत हे मराठी अभिमान गीत येत आहे .हे गीत गॅलक्सी म्युजिक प्रॉडक्शन या यू ट्युब चॅनलवर सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे,गीत सर्वांनी पहावे असे सागर उपासे प्रविण काटे विजय सोनवणे यांनी आवाहन केले आहे.

यावेळी गीतकार व निवेदक मदन धायरे,वंदनाताई रावलल्लू,अथर्व दिघे-देशपांडे, आणि पल्लवी काटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.संगीतकार व गायक अनिकेत .एन यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर संगीतकार सनी देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.