रूद्राक्ष फाउंडेशन संचलित रणरागिणी व शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित क्लॉथ बॅंकेचे दिमाखात उद्घाटन!!

0
986
सांगलीं/कडेगांव/हेमंत व्यास  :
 कडेगांव येथेरूद्राक्षा फौंडेशन संचलित रणरागिणी महिला कट्टा आणि शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित क्लाँथ बँक यांचे कडेगाव येथे उद्घाटन झाले.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे  पूजन करून करण्यात आले.यावेळी कडेगाव मधील असंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी सौ. संजीवनी डांगे व सौ.अश्विनी वेल्हाळ म्हणाल्या, महिला एकत्र आल्या तर स्वतःच्या, समाज्याच्या परिणामी देशाच्या विकासाला हातभर लागेल आणि यासाठीच रणरागिणी महिला कट्टा कार्यरत राहील. तसेच क्लाँथ बँकेच्या माध्यमातून अनेक गरजूंची कपड्याची गरज भागवली जाईल. प्रमुख पाहुण्या, आदर्श शिक्षिका सौ.शोभा खलिपे यांचे “मुलीला वाचवा, मुलीला शिकवा” या विषयावर बोलताना म्हणाल्या की,  व एका बाजूला मूलींना कमी लेखणारी मुलींच्या विरूद्ध असलेली समाज रचना आणि दुसऱ्या  व बाजुला   सहजरित्या मिळु शिकणारी,, परवडणारी गर्भलिंग परीक्षणाची सोय आणि त्या सवलतीचा गैर उपयोग करण्याची प्रवृत्ती यामुळे भ्रुणहत्येत वाढ होवुन बाल लिंग गुणोत्तर प्रमाण दिवसेंदिवस कमी होत गेलेले दीसुन येत आहे या समस्येवर  एकत्रीतपणे काम करून एकमेकांशी सहकार्य करण्याची आवश्यकता जाणुन घेवून सरकारने मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही योजना सुरू केली त्यामुळे ही चळवळ देशव्यापी मोहीम चळवळ बनली आहे.स्रीभ्रुणहत्या न होता मुलींनी जन्म घ्यावा,त्यांना निट वाढवले जावे,शिक्षण दिले जावे हरयाणा उद्देशाने आपण रूद्राक्षा फौंडेशन संचलित रणरागिणी महीला कट्टाच्या माध्यमातुन ही चळवळ कडेगावसह संपुर्ण तालुक्यात राबविण्याचा मानस आहे या चळवळीत मोठ्या संख्येने महीलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सौ.शोभा खलिपे यांनी केले.यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांनी दोन्ही संस्थेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व यास स्वतःच्या परिने शक्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.
दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांनी महिला सशक्तीकरणासाठी महिला कट्ट्याला तसेच गरजूंसाठी कपड्याची मदत व्हावी यासाठी क्लाँथ बँकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आव्हाहन केले आहे. यावेळी काजल हवलदार, अमरदिप खलिपे, अनिता हवलदार, श्रीकांत खलिपे, सुप्रिया खाडे, उमा शिंदे, पूजा खलिपे, कोमल पवार, वैशाली शिंदे, नंदा करांडे व कडेगाव महिला ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते