पाणीपुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे नगरसेवक मोटवानींनी टँकरने पुरविले पाणी – प्रभाग ३ मधील नागरीकांना मिळाला दिलासा

0
713
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     स्थानिक नगर परीषदेच्या पाणीपुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे आपल्या प्रभागातील नागरीकांची गैरसोय होऊ नये याकरीता प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक तथा गटनेता संजय मोटवानी यांनी स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करून होणारी गैरसोय टाळली.
      मालखेड तलावावर पाण्याचा साठा कमी असतांना उन्हाळ्यात नगर परीषदतर्फे दोन टँकरने संपुर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. याच टँकरने नगरसेवक संजय मोटवानी यांनी सुध्दा लक्ष देऊन मागील दीड महिण्यात प्रभाग ३ मध्ये नगर परीषदच्या टँकरने पाणीपुरवठा करवून घेतला होता. परंतु आता मागील तीन दिवसांपासुन तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे संपुर्ण शहराला केवळ दोन टँकरने पाणीपुरवठा शक्य नसल्याचे पाहुन नगरसेवक संजय मोटवानी व सौ. सुरेखा तांडेकर यांनी स्वखर्चाने प्रभाग ३ मधील राम नगर, शिव नगर, शिक्षक कॉलनी, टांगापुरा, इंदिरा नगर आदी भागात सलग तीन दिवस पाणीपुरवठा बाहेरील टँकरने केला. संजय मोटवानी यांच्या पुढाकाराने शहरवासीयांची होणारी गैरसोय टळली आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.