मुक्ताबाई पालखी सोहळा जालन्यात दाखल

456

मुक्ताईनगर/जालना —

दरकोस दर मुक्काम एक एक पाऊल मागे टाकत विठूनामाचे ध्यासात जवळ जवळ अर्धे अंतर पार करित संत मुक्ताबाई पालखी सोहळा जालना जिल्ह्यात दाखल झाला.
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर जि. जळगाव येथून 18जून रोजी प्रस्थान ठेवलेला मानाचा पालखी सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील शेवटचा मुक्काम आटोपून जालना जिल्ह्यात वाघरूळ गावी दाखल होताच गावातील आबालवृद्धासह आसपास चे गावकरी भजन मंडळानी मुक्ताबाई मुक्ताबाई जयघोषात स्वागत केले. प्रवासाचे निम्मेअंतर जवळपास संपत आल्याने वारकरी भाविकांना विठूरायाची दर्शनाची ओढ तिव्र झालेली दिसली .

जालना जिल्ह्यात पालखी सोहळा मुक्काम पुढिलप्रमाणे दुपार विसावा कंसात दि. 3 जुलै -(गोरक्षण) काजळाफाटा,दि.4 जुलै-(शेवगावपाटी) -अंबड ,दि.5 जुलै(दाढेगाव)-वडीगोद्री,दि.6 जुलै ( गुंदेवाडी ) – पाथरवाला बू. दि.7 जुलै ( शहागड )
शहागड येथे पादूकांना गोदावरी स्नानानंतर पालखी सोहळा बीड जिल्ह्यातील गेवराई मुक्कामी मार्गस्थ होईल.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।